Sada Sarvankar : ‘उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी रॅली काढली असती, तर…’, सरवणकरांचा धक्कादायक दावा

Sada Sarvankar : "या मतदारसंघात गेली 30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. काही वर्ष नगरसेवक होतो, काही वर्ष आमदार होतो. इथले मतदार, मतदारसंघ आईसारखा वाटतो. आईसारखं प्रेम मतदारसंघावर केलं. रोज लोकांना भेटणं, त्यांच्या सुख:दुखात सहभाही होण हे मी नेहमीच माझं कर्तव्य समजलं" असं सदा सरवणकर म्हणाले.

Sada Sarvankar : 'उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी रॅली काढली असती, तर...', सरवणकरांचा धक्कादायक दावा
अमित ठाकरे, सदा सरवणकर
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 12:26 PM

सगळ्या राज्याचं लक्ष माहिम विधानसभा क्षेत्राकडे लागलं आहे. यंदा माहीममध्ये बिग फाईट आहे. माहीममधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांचं मुख्य आव्हान आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणूक रिंगणात आहेत. माहीममध्ये तसं पहायला गेलं, तर तिरंगी लढत आहे. सदा सरवणकर हे माहीममधले तगडे उमेदवार आहेत. त्यांनी माघार घ्यावी, यासाठी महायुतीकडून बरेच प्रयत्न सुरु आहेत. लोकसभेला मनसेने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता, महायुतीला विधानसभेला त्याची परतफेड करायची आहे. त्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु आहेत. पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

आज सदा सरवणकर यांच्याशी TV9 मराठीने संवाद साधला. “महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी आशिर्वाद दिले होते. एबी फॉर्म दिला होता. लढण्याशिवाय पर्याय नव्हता. कर्तव्य समजून लढणार सांगत होतो. अर्थात या मतदारसंघात गेली 30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. काही वर्ष नगरसेवक होतो, काही वर्ष आमदार होतो. इथले मतदार, मतदारसंघ आईसारखा वाटतो. आईसारखं प्रेम मतदारसंघावर केलं. रोज लोकांना भेटणं, त्यांच्या सुख:दुखात सहभाही होण हे मी नेहमीच माझं कर्तव्य समजलं. केलेलं काम, लोकांच प्रेम, यावेळची ही निवडणूक काळाजी गरज आहे, असे आदेश शिंदेसाहेबांनी दिल्यामुळे निश्चिंत होतो” असं सदा सरवणकर म्हणाले.

सदा सरवणकरांना अडवण्याचा प्रयत्न का?

काल उमेदवारी अर्ज दाखल करताना मीडिया सोबत नव्हती, त्यावर सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिलं. “काल 3 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची वेळ होती. रॅली अडवावी, मी मतदान केंद्रापर्यंत पोहोचू नये, असे विरोधी व्यूहरचना करत होते. त्यामुळे मंदिरात सिद्धीविनायकाच दर्शन घेऊन फॉर्म भरायचा, हा रणनितीचा भाग होता. वेळ कमी होता” असं सदा सरवणकर म्हणाले. तुम्हाला कोण अडवू शकतो? तुम्हाला कोणावर संशय आहे? त्यावर सदा सरवणकर म्हणाले की, “अनेक लोक आहेत, त्यांना असं वाटतय की सदा सरवणकरने उभच राहू नये. पण मतदारांच माझ्यावर प्रेम होतं, त्यांचा दबाव होता, काहीही करुन अर्ज भरा” दीपक केसरकरांच्या विषयावरही सदा सरवणकर यांनी भाष्य केलं. दीपक केसरकर माझे नातेवाईक आहेत. दिवाळी निमित्त ते मला भेटायला आलेले. उमेदवारी मागे घेण्याबाबत ते एक अवाक्षरही बोलले नाहीत. बाहेर जाऊन जर ते असं बोलत असतील, तर ते मोठे राजकीय नेते आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.