AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : ‘श्रीकांत शिंदे यांना युवा सेना अध्यक्ष करा’ एकनाथ शिंदेच्या समोरच नेमकी कुणी केली ही मागणी?

मंगळवारी एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती. बुलडाण्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी ही मागणी करण्यात आली.

Shivsena : 'श्रीकांत शिंदे यांना युवा सेना अध्यक्ष करा' एकनाथ शिंदेच्या समोरच नेमकी कुणी केली ही मागणी?
श्रीकांत शिंदेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 8:10 PM

ठाणे : श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना युवा सेना अध्यक्ष करा, अशी मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समोरच ही मागणी करण्यात आलीय. विशेष म्हणजे खुद्द एकनाथ शिंदे यांच्या समोरच ही मागणी करण्यात आली. ही मागणी दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, तर बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलीय. आपल्याला युवा सेनेचं काम वाढवायचं आहे. त्यासाठी श्रींकात शिंदे यांना लवकरात लवकर युवा सेनेची जबाबदारी द्यावी, एवढी माझी मागणी आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय. मंगळवारी एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती. बुलडाण्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदेना युवासेनेचा अध्यक्ष करण्याची मागणी प्रतापराव जा यांनी यावेळी केली. इतकंच नव्हे तर खरी शिवसेना आमचीच आहे, असंदेखील त्यांनी यावेळी म्हटलं.

शिंदे नायक सिनेमाप्रमाणे…

नायक चित्रपट सारखे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असं म्हणत प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासमोरच ही मागणी केल्यानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनादेखील याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी थेटपणे यावर भाष्य करणं टाळलं.

बुलडाण्यातील सगळेच शिवसैनिक आपल्याला भेटायला आहेत. त्यांत युवा कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आहेत. त्यांना शिवसेना वाढवायची आहे. त्यासाठी ते सगळेजण प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही खासदार प्रतापराव जाधव यांनी महत्त्वाचं भाष्य केलं होतं. आगामी काळात शिंदे गट आणि भाजप एकत्रच निवडणुकीला सामोरा जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं. या निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला हा 60 : 40 असणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. नुकतंच भाजपचे नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकला चलो चा नारा दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण होतं. त्यानंतर अखेर प्रतापराव जाधव यांनी भाजपसोबतच्या फॉर्म्युल्यावर महत्त्वाचं भाष्य केलं होतं.

पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...