AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सुरेश धस यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद द्या’

एकीकडे पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावं, यासाठी कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत आहेत.

'सुरेश धस यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद द्या'
Follow us
| Updated on: Dec 04, 2019 | 4:01 PM

मुंबई : एकीकडे पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावं, यासाठी कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत असताना, दुसरीकडे आता भाजप आमदर सुरेश धस यांचेही कार्यकर्ते (Suresh Dhas opposition leader) आक्रमक झाले आहेत. सुरेश धस यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद द्या, अशी मागणी सुरेश धस (Suresh Dhas opposition leader) यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद किंवा राज्याचे प्रदेशाध्यक्षपद द्यावं अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली होती.  पंकजा मुंडे यांचं बंड शांत होते ना होते तोच आता भाजप आमदार सुरेश धस यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.

आमदार सुरेश धस यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद द्यावं, अशी मागणी धस समर्थकांनी केली आहे. त्यामुळे मुंडे आणि धस  समर्थकांत ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे.

मी नाराज नाही : पंकजा मुंडे 

भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं.  पंकजा मुंडे आपल्या पुढील वाटचालीबद्दल नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. पंकजा मुंडे यांनी काल माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली (Pankaja Munde on His Facebook Post). यावेळी त्यांनी आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगितलं. तसंच आपण नाराज नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

पंकजांनी शिवसेनेत जावं : प्रकाश शेंडगे

भाजप नेत्या पंकजा मुंडे या ओबीसी असल्यामुळेच त्यांचं पक्षात खच्चीकरण केलं जात आहे, असा घणाघाती आरोप धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे (Pankaja Munde should join Shiv Sena:  Prakash Shendge) यांनी केला. इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांनी हीच ती वेळ साधून, भाजपला सोडचिठ्ठी द्यावी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा, असा सल्ला मी देईन, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले.

संबंधित बातम्या 

नाराजी नाट्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया   

…म्हणून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा : प्रकाश शेंडगे  

तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच.
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.