Mamta banerjee : उद्या ममता बॅनर्जी मुंबईत दाखल होणार, शरद पवार यांची घेणार भेट
ममता बॅनर्जी मुंबईत आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्या भेट घेणार आहेत. ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे. शरद पवारांना भेटल्यानंतर ममता बॅनर्जी मुख्यमंत्र्यांना भेटणार होत्या पण ऐणवेळी ही भेट होणार नसल्याची माहिती समोर आलीय.
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. या दौऱ्यात त्या काही महत्वपूर्ण राजकीय भेटीगाठी घेणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तीन दिवसांचा मुंबई दौरा असल्याची माहिती समोर आली आहे. याआधीही ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत जाऊन काही बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.
शरद पवार यांची घेणार भेट
ममता बॅनर्जी मुंबईत आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्या भेट घेणार आहेत. ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे. शरद पवारांना भेटल्यानंतर ममता बॅनर्जी मुख्यमंत्र्यांना भेटणार होत्या पण ऐणवेळी ही भेट होणार नसल्याची माहिती समोर आलीय. शरद पवारांबरोबरच त्या आणखी काही नेत्यांची भेट घेणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
याआधी ममता बॅनर्जींचा तीन दिवसाचा दिल्ली दौरा
याधी ममता बॅनर्जी यांनी मागील आठवड्यात तीन दिवसांचा दिल्ली दौरा केला आहे. त्या दौऱ्यातही त्या अनेक बड्या नेत्यांना भेटल्या होत्या. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी ममता बॅनर्जींच्या भेटीगाठी सुरू असल्याचं बोललं जात आहे. पश्चिम बंगालच्या स्टेजवर मागेही ममता बॅनर्जींनी देशातले अनेक बडे नेते एकत्र आणल्याचं दिसून आलं होतं. त्या आणखी काही राज्यांचे दौऱ्या करणार असल्याच्याही चर्चा आहेत.
दिल्ली दौऱ्यात मोदी, शाह यांची भेट
ममता बॅनर्जी फक्त देशातील विरोधी पक्षांच्याच नाही तर सत्ताधारी पक्षांच्याही नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मागील आठवड्यातल्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. या भेटींनंतरही राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.