मनोहर पर्रिकर अनंतात विलीन

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास मिरामार समुद्रकिनारी विधीवत पर्रिकरांच्या पार्थिवाला मोठ्या मुलाने मुखाग्नी दिला. यावेळी लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गोवेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्मीकडून पुष्पचक्र, नेव्हीचं बँड पथक तर एअरफोर्सकडून बंदुकीची सलामी देऊन पर्रिकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री […]

मनोहर पर्रिकर अनंतात विलीन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास मिरामार समुद्रकिनारी विधीवत पर्रिकरांच्या पार्थिवाला मोठ्या मुलाने मुखाग्नी दिला. यावेळी लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गोवेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्मीकडून पुष्पचक्र, नेव्हीचं बँड पथक तर एअरफोर्सकडून बंदुकीची सलामी देऊन पर्रिकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नितीन गडकरींसह अनेक नेते अंत्यदर्शनाला उपस्थित होते.

गोव्याचेमुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचं रविवारी 17 मार्चला निधन झालं. वयाच्या 63 व्या वर्षी दीर्घ आजाराने मनोहर पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर कर्करोगाशी लढण्यात ते अपयशी ठरले. भारतीय राजकारणातील अत्यंत साधे आणि सुस्वभावी असं व्यक्तिमत्त्व मनोहर पर्रिकर यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेलं.

पर्रिकरांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी 9.30 ते 10.30 पर्यंत मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पणजी भाजप कार्यालयात ठेवण्यात आलं. त्यांनतर 10.30 वाजता पर्रिकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कला अकादमी इथे नेण्यात आलं. तिथे 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत पार्थिव सर्व नागरिकांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. दुपारी 4 नंतर पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मीरामार समुद्र किनारी नेण्यात आलं. संध्याकाळी 5 नंतर अंत्यविधीला सुरुवात झाली आणि सव्वासहाच्या सुमारास पर्रिकरांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला.

LIVE UPDATE :

  • लाडक्या नेत्याला साश्रूनयनांनी अखेरचा निरोप
  • पर्रिकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
  • मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी, अंत्यविधी सुरु, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार
  • पर्रिकरांचं पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार
  • मनोहर पर्रिकर यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी
  • मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव पणजीतील भाजप कार्यालयात नेणार

    • मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात जाणार
    • भाजपच्या निवडणूक समितीची आज बैठक होणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह गोव्याला जाणार
    • मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय हालचालींना वेग
    • केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता बैठक, मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहणार
    • मनोहर पर्रिकर यांना रिपाइं आणि माझ्याकडून आदरांजली – रामदास आठवले
    • थोड्याच वेळात मनोहर पर्रिकरांचं पार्थिव पणजी येथील भाजप कार्यालयात आणलं जाईल

पर्रिकरांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

  • मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज (18 मार्च) अंत्यसंस्कार केले जातील
  • त्याआधी सकाळी 9.30 ते 10.30 मनोहर पर्रिकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पणजी भाजप कार्यालयात ठेवण्यात येईल.
  • त्यांनतर 10.30 वाजता पर्रिकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कला अकादमी इथे नेण्यात येईल.
  • तिथे 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत पार्थिव सर्व नागरिकांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
  • दुपारी 4 वाजता पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मीरामार इथे नेण्यात येईल.
  • संध्याकाळी 4.30 वा. अंत्यविधी
  • संध्याकाळी 5 वा. पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

शाळा, महाविद्यालये बंद, 7 दिवसांचा दुखवटा

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने गोव्यात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी गोव्यातील शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. शिवाय गोव्यातील आजच्या (18 मार्च) विविध परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

मनोहर पर्रिकर यांचा अल्पपरिचय

13 डिसेंबर 1955 रोजी मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील मापुसा येथे जन्म झाला. मार्गोओ येथील लोयोला हायस्कूल येथे शिक्षण घेतलं. त्यांचं माध्यमिक शिक्षण मराठी भाषेतून झालं. पुढे 1978 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

आयआयटी शिक्षित मनोहर पर्रिकर हे भारतातील पहिले आमदार आहेत.

मनोहर पर्रिकर यांनी सुरुवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केलं. तरुण वयातच ते संघात मुख्य शिक्षक बनले. पुढे राजकारमात त्यांनी भाजपमधून प्रवेश घेतला.

1994 साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून गेले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2000 रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा कालावधी गोव्यात घालवला.

2014 साली केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर मनोहर पर्रिकर हे देशाचे संरक्षणमंत्री झाले. त्यासाठी उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर गेले. मात्र, गोव्यात राजकीय त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्याने, पर्रिकर पुन्हा गोव्यात परतले आणि मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली. मात्र, याच काळात त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. त्यामुळे वारंवार उपचारासाठी परदेशात जावं लागत होतं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.