Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा फडणवीस यांच्यावर सर्वात मोठा आरोप, म्हणाले, फडणवीस हेच भुजबळांना…

Manoj Jarange Attack on Fadnavis : मनोज जरांगे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी मराठवाड्यात शांतता रॅली सुरु आहे. रॅलीच्या चौथ्या दिवशी त्यांनी असा शा‍ब्दिक हल्ला केला...

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा फडणवीस यांच्यावर सर्वात मोठा आरोप, म्हणाले, फडणवीस हेच भुजबळांना...
जरांगे पाटील यांचा पुन्हा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 11:34 AM

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन उभं केले आहे. पुढील वादळापूर्वीची ही शांतता रॅली असल्याची चर्चा आहे. 6 ते 13 जुलैपर्यंत त्यांचा मराठवाडा दौरा आहे. या दरम्यान ते मराठवाड्यात समाज बांधवांशी संवाद साधत आहेत. शांतता रॅलीतून त्यांनी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे. त्यांनी फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

फडणवीसांवर मोठा आरोप

यावेळी जरांगे पाटील यांनी नांदेड येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. मी त्यांना समजून सांगितले आहे. त्याचा अर्थ त्यांनी काय काढायचा तो काढावा. ते जनतेशी खुनशी पणाने वागतात हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यांच्यामुळे गरिबांचे वाटोळे होत, हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यांना वाटतं नेते जवळ आले म्हणजे जनता जवळ आली. आता त्यांनी भुजबळ यांना जवळ केलं आहे. .फडणवीस भुजबळ यांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षत आलं आहे. फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रीपद यासाठीच दिलं आहे का? असा सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

मराठ्यांची काही माकडं फडणवीसांसोबत

मंत्री म्हणतात हे आरक्षण टिकणार नाही म्हणजे आरक्षण हेच देणार आणि उडवणार हेच म्हणजे सगेसोयरे अंमलबजावणी हे देणार आणि आणखी उडवणार हे नक्की आहे, या दुटप्पी धोरणावर त्यांनी टीका केली. सरसकटच्या अध्यादेशाने यांचं फार पोट दुखतं, सगे सोयरे अंमलबजावणी यांनीच द्यायची आणि टिकवायची जबाबदारी सुद्धा यांचीच राहील आमहाला गॅझेट सुद्धा लागू पाहिजे. मराठ्यांचे 2-4 माकड फडणवीस यांच्या बाजूने बोलतात. त्यामुळे समाजात नाराजी आहे. डेड लाईनबद्दल काहीही चर्चा झाली नाही ते देतील आणि टिकवतील.

शंभुराजे देसाई काय म्हणाले

शंभूराजे देसाई यांना काल आणि रात्री बोललो आहे. गॅझेट अंमलबजावणी होणार असं त्यांनी सांगितलं. सगे सोयरे अंमलबजावणी आमच्या पद्धतीने आम्हाला हवी असं त्यांना आम्ही सांगितलं. सौम्य पद्धतीने मी सरकारवर टीका करावी अशी कोणतीही चर्चा झाली नाही. मराठा समाजातील शेवटचा माणूस सगे सोयरेमध्ये जाईपर्यंत मी शांत बसणार नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मागण्यांवर अंमलबजावणी करावी. दौऱ्याचा आज चौथा दिवस आहे. आता तिसऱ्या जिल्ह्यात दौरा झाला आहे. राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलाय. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये? असा सवाल त्यांनी केला.

एसबीसी आणि ईडब्ल्यूएस सवलत

मुख्यमंत्र्यांना मी 4-5 दिवसांपूर्वी बोललो होतो. जो मुलींसाठी 100 टक्के शिक्षण केलं होतं, त्यांची अंमलबजावणी केली असेल तर त्यांचं अभिनंदन, सगळ्यांच्या लेकींना त्यांच्यामुळे न्याय मिळाला. त्याबद्दल सरकारचं कौतुक पण अँडमिशन घेताना जी मुलींकडून जे शुल्क घेतले ते परत करा. पावसात देखील मराठे रॅलीत येणार कारण आमची आरक्षण ही वेदना आहे काम बंद ठेऊन रॅलीत या. मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना निवडून येऊ देत नाही. मराठाच राज्यात किंग राहिला पाहिजे पाडा म्हणण्यात खूप ताकद आहे. 2-3 टप्पे होऊ द्या मग बॉंबच फोडणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.