मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवा आरोप; मराठा नव्हे, या आरक्षणावरून टाकला बॉम्ब

राज्यातील 288 मतदारसंघात आपण घोगंडी बैठक घेणार आहोत. आपण बैठकाही घेत आहोत आणि सभाही होत आहेत. आपल्या घोंगडी बैठकांनाही मैदान लागतं हे आपलं यश आहे. ही आरपारची लढाई आहे. कितीही आडवे येऊ द्या, आता आपण थांबत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवा आरोप; मराठा नव्हे, या आरक्षणावरून टाकला बॉम्ब
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 10:08 PM

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांना घेरलेलं असतानाच मनोज जरांगे यांनी आता फडणवीस यांच्यावर नवा आरोप केला आहे. फडणवीस यांनी गोड बोलून धनगर आरक्षण मोडून काढलं, असा खळबळजनक आरोपच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर फडणवीस काय उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी हा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यानी माझी एसआयटी चौकशी लावलीय. तिकडे 70 हजारवाले चोर आहेत. त्यांची एसआयटी लावायची सोडून माझी एसआयटी लावली आहे. फडणवीस यांनी जो ट्रॅप लावला आहे, त्यात मी मेलो तरी बदलणार नाही, असं सांगतानाच आपल्याला आरक्षण नाही मिळालं तर सरकारचा सुपडा साफ करायचा आहे, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

केस होऊ द्या, पण हटू नका

फडणवीस यांनी नवीन नवीन आमदार उभे केले. फडणवीस यांच्या माध्यमातून यांना त्यांच्या संपत्ती सांभाळायची आहे. पण फडणवीस साहेब मराठे तुम्हाला लोळवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आरक्षण दिलं नाही तर तुमचे 113 उमेदवार घरी गेलेच म्हणून समजा. गोरगरीब मराठ्यांनी आता जागं व्हावं. मार खायची वेळ आली तर का. केस झाली तर होऊ द्या. पण मागे हटू नका, असं आवाहनच त्यांनी केलं.

मराठा सेवक टीम बनवा

माझ्या विरोधात खूपजण उठले आहेत. दर आठवड्याला आमदार बदलत आहेत. नगरला कसे बैल बदलत आहेत, तसे आमदार बदलत आहेत. हे दोन तीन महिने सावध राहा, बेसावध राहू नका. उद्यापासून एक काम करा, गावात मराठा सेवकांची टीम करा, यातून मराठा समाजाचे प्रश्न सोडावा. गरीब मराठ्यांना काम पडलं तर त्याने ते सांगायचं कोणाला? म्हणून हक्काची मराठा सेवक अशी टीम करा. या टीमकडून काम झालं नाही तर तालुक्याच्या ठिकाणावर होईल, तिथं नाही झालं तर जिल्ह्याच्या ठिकाणी होईल, असंही त्यांनी सांगितलं.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.