अंबानींच्या घरासमोर स्फोटक पदार्थ असलेली चारचाकी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास ATS कडे : गृहमंत्री अनिल देशमुख

मुकेश अंबानी  यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.

अंबानींच्या घरासमोर स्फोटक पदार्थ असलेली चारचाकी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास ATS कडे : गृहमंत्री अनिल देशमुख
अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 10:25 PM

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी  यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली. (Ambani Antilia House outside Explosive With Car Case transfer To ATS Says home Minister Anil Deshmukh)

गृहमंत्री देशमुख म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थ सापडलेली स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. ही गाडी सॅम पीटर न्यूटन यांच्या मालकीची होती. हिरेन यांचे गॅरेज आहे. गाडीच्या अंतर्गत सजावटीसाठीचे (इंटिरिअर) गॅरेजचे पैसे मूळ मालकाने  दिले नाही म्हणून त्यांची गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. आज रेतीबंदर या ठिकणी हिरेन यांचा मृतदेह सापडला.”

“अंगावर कोणत्याही खुणा नाहीत. ठाणे पोलिस त्याची चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवालात सर्व बाबी स्पष्ट होतील. महाराष्ट्र पोलीस, मुंबई तसेच ठाणे पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सक्षम आहेत”, असे देशमुख म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी, अशी मागणी विधानसभेत केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएसकडून करण्यात येईल, असे निवेदन गृहमंत्री देशमुख यांनी सभागृहात केले

सभागृहात काय काय झालं…?

मनसुख हिरेन संशायस्पद मृत्यूप्रकरणावरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात विधानसभेत चांगलीच जुंपली. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आरोप केल्यानंतर तुम्ही कुणाला वाचवत आहात? असा सवाल फडणवीस यांनी करताच अर्णव गोस्वामींना आत टाकलं म्हणून तुमचा वाझेंवर राग आहे का?, असा पलटवार अनिल देशमुख यांनी केला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. (anil deshmukh slams devendra fadnavis over sachin waze)

मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिवेशनात येऊन अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभेत या विषयावर निवेदन दिलं. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूची माहिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणावर काही प्रश्न उपस्थित केले.

अंबानींच्या घरासमोर स्फोटक पदार्थ असलेली चारचाकी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास NIA कडे द्या

मनसुख हिरेन संशायस्पद मृत्यूप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही कुणाला वाचवत आहात?, असा सवाल गृहमंत्र्यांना विचारला. तसंच या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी फडणवीस यांनी केली.

हिरेन यांचा मृतदेह सापडला असून त्यांचे हात बांधलेले होते. त्यांच्या मृतदेहाचे फोटो मी पाहिले आहे. हात बांधून कोणी आत्महत्या करत नाहीत. तसेच क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्वात आधी गोस्वामी पोहोचले कसे? वाझे यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास कस? असा सवाल फडणवीस यांनी केला.

कोण सचिन वाझे? काळा की गोरा आम्हाला माहीत नाही. त्याने काय केलं किती एन्काऊंटर केले त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असं सांगत याप्रकरणाचे माझ्याकडे पुरावे आहेत. सीडीआर आहे. स्टेटमेंट आहे. मी हवेत बोलत नाही. त्यामुळे तुम्ही विरोधी पक्षनेत्यांचे आरोप गंभीरपणे घेतले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

आशिष शेलार काय म्हणाले…?

तुम्ही त्या वाझेला आमच्या अंगावर टाकू नका. तो वाझे बिझे गेला वाजत. या प्रकरणाची निक्ष:पणे चौकशी झाली पाहिजे. जर काळं बेरं नाही तर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे का देत नाही? तुम्ही स्वत: या प्रकरणात म्हटलं पाहिजे की हे प्रकरण आम्ही एनआयकडे देतो म्हणून, असा आक्रमक पवित्रा शेलार यांनी घेतला.   गृहमंत्र्यांच्या उत्तरात विसंगती आहे. वाझेचं नाव आलं की मुंबई पोलिसांचं नाव गृहमंत्र्यांनी जोडलं, असा आरोप शेलार यांनी केला.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले…?

गृहमंत्र्यांनी सचिन वाझे आणि अर्णवची अटक यावरुन जे निवेदन दिलं ते न पटणारं आहे. आम्हाला त्या वाझेचं देणंघेणं नाही. गृहमंत्र्यांनी वाझे यांचा उल्लेख कााढला पाहिजे. त्या वाझेची भीती आम्हाला दाखवू नका, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचं निवेदन

मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिवेशनात येऊन अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभेत या विषयावर निवेदन दिलं.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ठाणे आणि मुंबई पोलीस सक्षम आहे. एएनआयकडे तपास देण्याची गरजच नाही, असं सांगताना अर्णवला आतमध्ये टाकलं म्हणून तुमचा त्याच्यावर राग आहे का?, असा सवाल त्यांनी विरोधी पक्षाला केला.

(Ambani Antilia House outside Explosive With Car Case transfer To ATS Says home Minister Anil Deshmukh)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.