‘देवेंद्र फडणवीसांच्या हातात सत्ता द्या’; उदयनराजेंनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखवली: दरेकर

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळेच मराठा समाजाच्या मनात ही भावना असल्याचे दरेकर यांनी सांगितले. | Pravin Darekar

'देवेंद्र फडणवीसांच्या हातात सत्ता द्या'; उदयनराजेंनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखवली: दरेकर
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 7:31 PM

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या. मराठा आरक्षणाची जबाबदारी मी घेतो, असे सांगून खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखविली आहे, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळेच मराठा समाजाच्या मनात ही भावना असल्याचे दरेकर यांनी सांगितले. (Pravin Darekar reaction on Udyanraje Bhosle statement)

उदयनराजे भोसले यांनी रविवारी साताऱ्यात मराठा समाजातील तरुणांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी जाहीर पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या सरकारच्या काळात करुन दाखवलं होतं, पण आज त्यांना नावं ठेवली जातात. आज तुम्ही सत्तेत आहात तर करुन दाखवा, असे थेट आव्हान उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिले.

उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केले. मराठा आरक्षण मागण्याची गरज नाही. ज्यांना जे बोलायचं ते बोलू द्या. राज्य सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर आहे. न्यायालयाकडून जेव्हा निर्णय येईल तो मजबुतीने मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.

‘मराठ्यांचे कैवारी ही उपमा तुम्हाला शोभते का?

मराठ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्यांना ही उपमा किती शोभा देते? असा सवालही उदयनराजे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही मराठा नेत्यांना विचारला आहे. यावेळी त्यांनी थेट कोणत्याही नेत्याचे नाव घेणं मात्र टाळलं. पण त्यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होता, अशी चर्चा आता सुरु आहे. आपला कुणीही शत्रू नाही. मग ते पवार साहेब असतील किंवा अन्य कुणी, असंही उदयनराजे यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या:

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो’, उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही; उदयनराजेंचा सवाल

(Pravin Darekar reaction on Udyanraje Bhosle statement)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.