’10 दिवसात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार’, अब्दुल सत्तार यांचं खूप मोठं वक्तव्य
"जोपर्यंत माझ्यावर एकनाथ शिंदे यांचां विश्वास आहे तोपर्यंत माझं चिन्ह हे धनुष्यबाण असेल. जेव्हा विश्वास उडेल तेव्हा एकनाथ शिंदे यांनी सांगावे" असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. पंजाब नंतर महाराष्ट्र राज्य असेल जिथं वीज बिल माफ असेल.
“शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली, यासाठी एकनाथ शिंदे यांचा मनापासून आभारी आहे. शेतकऱ्यांना माफ केलेले पैसे जिल्हा बँकेला सरकारने १०० कोटी रुपये वापरायला द्यावे. 150 कोटी व्याज हे शेतकऱ्यांना भुर्दंड असून तो कमी करण्यासाठी सरकारने मदत करावी. बँकिंग व्यवहारात हे मंदिर ( जिल्हा बँक ) चालवायची असेल तर शासनाची मदत लागेल. 100 कोटी रुपयांच पॅकेज हे बँकेला द्यावे. शेतकऱ्यांना माफ केलेले पैसे हे दहा वर्ष बँकेला वापरायला द्यावेत” अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी सरकारकडे केली आहे.
“अजित पवार यांनी कालच सांगितले की वीज मोफत मिळेल. पंजाब नंतर महाराष्ट्र राज्य असेल जिथं वीज बिल माफ असेल. शेतकऱ्यांना साडे सातच्या मोटारीला वीज बिल भरावे लागणार नाही” असं अब्दुल सत्तार म्हणाले. “अल्पसंख्यांक समाजाला देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत जेवढा निधी मिळाला नव्हता, तेवढा निधी हा एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मिळाला. अल्पसंख्यांक समाजाला आतापर्यंत जो निधी मिळाला नाही, तो निधी आता मिळणार आहे” असं अब्दुल सत्तार म्हणाले.
मालकाचा कुणी मालक असतो का?
“मला मुख्यमंत्री म्हणाले, तर पालकमंत्री होईल. ते आमचे मालक आहेत. मालकाचा कुणी मालक असतो का?” असं अब्दुल सत्तार यांनी विचारलं. काँग्रेस प्रवेशावर ते म्हणाले की, “जोपर्यंत माझ्यावर एकनाथ शिंदे यांचां विश्वास आहे तोपर्यंत माझं चिन्ह हे धनुष्यबाण असेल. जेव्हा विश्वास उडेल तेव्हा एकनाथ शिंदे यांनी सांगावे”
’10 दिवसात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज’
“मी मनोज जरांगे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला होता. बाकीचे खडकु छाप लोकमध्ये येतात. मनोज जरांगे यांनी मागणी केली, त्यांचा मी सन्मान करतो. बाकी मला जे काही बोलत आहेत, ते खडकु छाप बडबड करतात असं लक्ष्मण हाकेना उद्देशून म्हणाले” “मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. 10 दिवसात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार” अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य