Manoj jarange Patil | ‘आधी तुमच्या माणसाने…’, मनोज जरांगे पाटील यांचं अजित पवारांना उत्तर
Manoj jarange Patil | मनोज जरांगे पाटील य़ांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. त्यांना उदंड प्रतिसाद मिळतोय. मनोज जरांगे पाटील यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उत्तर दिलं आहे. या दौऱ्यामध्ये काही ठिकाणी मराठा समाज कमी असल्यामुळे त्या ठिकाणी कमी गर्दी होती.
जालना (संजय सरोदे) : “आधी तुमच्या माणसाने आम्हाला बोलायची गरज नव्हती. 10-15 दिवस बोललो नव्हतो. तुमच्या माणसाने जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केलीत. सगळ वातावरण विनाकारण दूषित करुन ठेवलं. आम्ही बोललो की, तुम्हाला का वाईट वाटतं? तुमचा माणूस बोलला तेव्हा वाईट नाही वाटलं का? त्यांच्या माणसाने दुरुस्ती केली, गप्प बसला, तर आम्ही आमच्यात बदल करु. 1 तारखेपर्यंत त्यांचा माणूस गप्प बसतो का पाहू? अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला. ते अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये बोलत होते. “23 तारखेपर्यंत टाईम बाँड दिला नाही, तर एक तारखेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. रात्री फोन आला होता, टाईम बाँड आणि गुन्ह्यासंदर्भात चर्चा झाली आहे आणि त्यावर बच्चू कडू यांनी स्टेटमेंट दिलं आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“या दौऱ्यामध्ये काही ठिकाणी मराठा समाज कमी असल्यामुळे त्या ठिकाणी कमी गर्दी होती. परंतु या दौऱ्याला समाजाने प्रचंड प्रतिसाद दिला आणि मी समाजाचा आभारी आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “स्वतःच्या लेकरासाठी समाजाने खूप उठाव केलाय, नोकरदार आणि बुद्धिजीवी वर्ग ही बाहेर पडला आहे. आपल्या लेकराचे चांगले होते आणि आपण लढले पाहिजे यासाठी मराठा समाज उपस्थित राहिला, ज्या मराठ्यांना आरक्षण आहे त्या मराठ्यांनीही ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे, आहे त्यांच्या मदतीला आले पाहिजे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा संवाद दौऱ्याचे अजून दोन टप्पे राहिले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
आता मनोज जरांगे पाटील कुठला दौरा करणार?
मनोज जरांगे पाटील लवकरच खानदेश विदर्भ दौरा तसेच नांदेड लातूर परभणी जो राहिलेला भाग आहे त्याठिकाणी दौरा करणार आहेत. मागच्या चार दौऱ्यापेक्षा हा दौरा खूप मोठा असणार आहे. केंद्रीय पातळीवर जाट आंदोलन करणार आहेत. “त्याबाबत मला काही माहीत नाहीय. अधिकृत माहिती नाही, त्यामुळे आपण स्टेटमेंट दिलं नाही पाहिजे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.