बीडमधील मराठा मोर्चाला प्रशासनाची परवानगी नाही; मोर्चा निघणारच, विनायक मेटे ठाम

प्रशासनाकडून मात्र या मोर्चाला परवानगी नसल्याचं कळतंय. असं असलं तर मराठा मोर्चा निघणारच अशी ठाम भूमिका विनायक मेटे यांनी घेतली आहे.

बीडमधील मराठा मोर्चाला प्रशासनाची परवानगी नाही; मोर्चा निघणारच, विनायक मेटे ठाम
विनायक मेटे,नेते, शिवसंग्राम
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 6:02 PM

प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चाची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी बीड जिल्ह्यात विविध संघटनांच्या बैठकाही घेतल्या आहेत. भाजपनेही विनायक मेटे यांच्या नेृतृत्वातील मोर्चाला पाठिंबा दिला आहे. अशावेळी प्रशासनाकडून मात्र या मोर्चाला परवानगी नसल्याचं कळतंय. असं असलं तर मराठा मोर्चा निघणारच अशी ठाम भूमिका विनायक मेटे यांनी घेतली आहे. (Maratha Morcha in Beed is not allowed by the administration)

विनायक मेटे यांनी 5 जून रोजी काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या परवानगीसाठी अद्याप अर्ज केलेला नाही. त्यामुळे या मोर्चाला परवानगी नसल्याचं बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सांगितलं आहे. त्याबाबत विचारलं असता सध्याच्या परिस्थितीत परवानगी मागितली असती तरी ती मिळेल याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे परवानगी असो वा नसो उद्या बीडमध्ये मराठा मोर्चा निघणारच, अशी भूमिका मेटे यांनी स्पष्ट केलीय. या पार्श्वभूमीवर मेटे यांनी आज बीडमधील छत्रपती शिवाजी महारात स्टेडियमची पाहणी केली.

कारवाईला सामोरं जाण्यास तयार – मेटे

प्रशासनाकडे मोर्चाला परवानगी मागितली असती तर लॉकडाऊनचं कारण सांगत ती देण्यात आली नसती. त्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली नाही. मात्र, परवानगी नसली तरी आम्ही मोर्चा काढणार. मराठा आरक्षणासाठी आम्ही मोर्चा काढणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना सांगितलं आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर तरुण-तरुणींमध्ये आक्रोश वाढत आहे. उद्या दर प्रशासनाची कारवाई झाली तर त्याला सामोरं जाण्यास तयार असल्याचं विनायक मेटे यांनी म्हटलंय.

मराठा मोर्चाला भाजपचा पाठिंबा

मराठा आरक्षण लढ्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा शेलार यांनी यावेळी केली. तसंच मराठा समाजाची टिंगल टवाळी करण्याचं काम शिवसेनेनं केलंय. मराठा समाजाला 3 हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज द्या, अशी मागणीही त्यांनी केलीय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 5 जून रोजी बीडमध्ये विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मोर्चा होत आहे. या मोर्चाला भाजपचा पाठिंबा आहे, असंही शेलार यांनी 2 जूनला बीड जिल्हा दौऱ्यात जाहीर केलं आहे.

संबंधित बातम्या :

उद्याचा बीडचा मोर्चा मराठा समाजाचा नसून भाजपचा; काँग्रेसचा आरोप

Maratha Reservation: शरद पवार आणि संभाजीराजेंची अवघ्या 10 मिनिटांची चर्चा सकारात्मक कशी, विनायक मेटेंचा सवाल

Maratha Morcha in Beed is not allowed by the administration

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...