‘दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’, शिवसेनेचा टोला

दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहे. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबद्दल ते बोलत नाही. तर मिठाला जागल्यासारखं ते बोलत आहेत, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलीय.

'दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं', शिवसेनेचा टोला
उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या भेटीवर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 8:30 PM

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी दोन्ही राजेंमध्ये मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे यांनी मराठा समाजाचा उद्रेक झाला तर जबाबदार कोण? असा सवाल राज्य सरकारला विचारलाय. यावर बोलताना मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागतंच आहे. पण दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहे. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबद्दल ते बोलत नाही. तर मिठाला जागल्यासारखं ते बोलत आहेत, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलीय. (Arvind Sawant’s reaction to the meeting between UdayanRaje and SambhajiRaje)

राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांबाबत बोलताना राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत घटनेप्रमाणे निर्णय घेतला गेला पाहिजे. पण निव्वळ राजकारण करण्यात काम सध्या सुरु असल्याचं सांगत घटनेची पायमल्ली होत असल्याचा आरोप सांवत यांनी केलाय. त्याचबरोबर राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. राम मंदिराबद्दल आमच्या भावना स्पष्ट आहेत. धर्माच्या भावनांशी खेळू नका असं वक्तव्यही सावंत यांनी केलंय.

मुंबईतील मोडकळीस आलेल्या चाळींचा मुद्दा

मुंबईतील मोडकळीस आलेल्या चाळीसंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेऊनही सहा महिन्यांपासून या कायद्याला मंजुरी मिळत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारच्या कायद्याप्रमाणे मोडकळीस आलेल्या इमारतींचं पुनवर्सन होऊ शकत नसेल तर म्हाडाने ते करावं अशी आपली मागणी असल्याचं सावंत म्हणाले.

विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया काय?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे. कुठल्याही समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. पण राजेंनी ओबीसींसाठीही प्रयत्न केले पाहिजे. राजे हे सर्वांचे अर्थात सर्व समाजाचे असतात, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीचं स्वागत केलं. तसंच दोन्ही राजेंकडून ओबीसी समाजासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.

खासदार उदयनराजे काय म्हणाले?

खासदार संभाजी छत्रपती यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणावर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. सुरुवातीलाच उदयनराजे यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. मला सर्वांना सांगावसं वाटतं, आम्ही दोघं एकाच घराण्याचे आहोत. संभाजीराजे वंशज राजाराम महाराजांचे, वडील एकच… त्यामुळे दोन घराण्यांचा संबंध नाही, आम्ही एकच आहोत. संभाजीराजेंनी टेक्निकल मुद्दे मांडले. प्रत्येकाने ठरवायचं आहे, देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? देशाची फाळणी करण्याच्या दृष्टीने आजचे राज्यकर्ते प्रयत्नशील आहेत असा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे. हे राज्याच्या बाबतीत आणि केंद्राबाबतीतही लागू आहे, असं उदयनराजे म्हणाले.

संबंधित बातम्या :

पक्ष-बिक्ष सोडा, आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो : उदयनराजे

दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, उदयनराजे आणि माझं सर्वच मुद्द्यांवर एकमत: संभाजी छत्रपती

Arvind Sawant’s reaction to the meeting between UdayanRaje and SambhajiRaje

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.