Independence Day : भारतीय स्वातंत्र्यानंतर पण राज्यातील हा प्रदेश होता पारतंत्र्यात, ‘ऑपरेशन कबड्डी’ने आणली स्वातंत्र्याची पहाट; मग डौलात फडकला तिरंगा

Operation Polo : भारताला स्वातंत्र्य मिळवून 77 वर्षे पूर्ण झाली. पण राज्यातील या प्रदेशाला देशात स्वातंत्र्याची पहाट उगवून सुद्धा एक वर्ष 32 दिवस पारतंत्र्यात घालवावी लागली होती. जनतेने नेटाने लढा दिला. तत्कालीन केंद्र सरकारने पोलीस कारवाई केली. तेव्हा हा प्रदेश गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाला.

Independence Day : भारतीय स्वातंत्र्यानंतर पण राज्यातील हा प्रदेश होता पारतंत्र्यात, 'ऑपरेशन कबड्डी'ने आणली स्वातंत्र्याची पहाट; मग डौलात फडकला तिरंगा
एक वर्षानंतर उगवली स्वातंत्र्याची पहाट
Follow us
| Updated on: Aug 14, 2024 | 2:56 PM

भारताला स्वातंत्र्य मिळवून 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपण स्वातंत्र्याचा नुकताच अमृत महोत्सव साजरा केला आहे. तर आता देशाची वाटचाल शताब्दी महोत्सवाकडे सुरु आहे. इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. त्यासाठी अनेक जणांनी प्राणांची आहुती दिली. तुरुंगवास सहन केला. तेव्हा आजचा भारत आकाराला आला. पण राज्यातील या प्रदेशाला देशात स्वातंत्र्याची पहाट उगवून सुद्धा एक वर्ष 32 दिवस पारतंत्र्यात घालवावी लागली होती. जनतेने नेटाने लढा दिला. तत्कालीन केंद्र सरकारने पोलीस कारवाई केली. तेव्हा हा प्रदेश गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाला.

इंग्रजांची शेवटची चाल

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 535 लहानसहान संस्थाने खालसा करण्यात आली. मोठ्या संस्थानांना पाकिस्तानात – भारतात सहभागी होण्याचा अथवा स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. अर्थात ही इंग्रजांची शेवटची चाल होती. त्यावेळी काही संस्थानांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद संस्थान हे त्यातील एक होते. उस्मान अली शाह आसिफ जाह सातवा हा हैदराबाद संस्थानचा त्यावेळचा प्रमुख होता. या निझामाचा प्रमुख म्हणून कासिम रिजवी हा या संस्थानचा कारभार पाहत होता. तो मुळचा मराठवाड्यातील होता. त्याने रझाकार नावाची कट्टर धार्मिक संघटना उभारली होती. या संघटनेला पाकिस्तानचे समर्थन होते. या संघटनेने हैदराबाद संस्थान अंतर्गत मराठवाड्यातील जनतेवर विशेषतः हिंदूवर प्रचंड अत्याचार सुरू केले होते.

हे सुद्धा वाचा

स्वातंत्र्य मिळवूनही मराठवाडा पारतंत्र्यात

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण मराठवाड्यातील जनता पुढील 13 महिने दोन दिवस पारतंत्र्यातच होती. स्वतंत्र भारताच्या नकाशावर दक्षिण भारतात निझामाचे हैदराबाद संस्थान एखाद्या बेटासारखे दिसत होते. हा पोटातील अल्सरच होता. रझाकारांनी अत्याचाराची सीमा गाठली होती. मुस्लिमेतरांवर घोर अन्याय सुरू होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आधीपासूनच हैदराबाद संस्थानात पण स्वातंत्र्याचा अंकुर फुटला होता. हैदराबाद संस्थान देशात विलीन होण्यासाठी जनतेने निझामावर दबाव वाढवला. तसा रझाकारांनी अन्यायाचा कहर केला. या पारतंत्र्याविरोधात निजाम राजवटीतील मराठवाड्याने रणशिंग पुकारले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे धडे निजामाविरोधात गिरवले. रझाकारांना जशाच तसे उत्तर दिले.

‘बाबासाहेब का भाषण सुनने से मुर्दे भी जिंदा होते है’

निझामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी मराठवाड्याला मोठा संघर्ष करावा लागला. या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. गोविंदभाई श्रॉफ यांनी 1938 मध्ये वंदेमातरम आंदोलनाचा श्रीगणेशा केलाच होता. त्यांच्या आंदोलनाचा निझामाने मोठा धसका घेतला. त्यांच्यामागे पोलीस लावले. पण विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग त्यांच्यामागे होता. अठरापगड जातीच्या तरुणांनी या स्वातंत्र्य लढ्यात खांद्याला खांदा देऊन सशस्त्र लढा दिला.

स्वामी रामानंद तीर्थ यांचे ज्येष्ठ सहकारी आ. कृ. वाघमारे, रा. गो. उर्फ बाबासाहेब परांजपे यांनी मोलाचे योगदान केले. मराठवाड्यातील लोक त्यांना ‘शेर–ए- हैदराबाद’ म्हणत. ‘बाबासाहेब का भाषण सुनने से मुर्दे भी जिंदा होते है’, असे रझाकार म्हणायचे. त्यांच्या जहाल भाषणाने मराठवाड्यातील तरुणांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुलिंग पेटले. मराठवाड्यातील तरुणांना हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी कॅम्प उभारले. ते स्वतः हातबॉम्ब तयार करत. ते गांधींजीच्या प्रभावाखाली असले तरी रझाकारांच्या अन्यायामुळे ते जहाल क्रांतीकारी झाले. निझाम त्यांना खूप घाबरून होता. त्याने बाबासाहेबांना पकडून समोर हजर करणाऱ्यास निझामाने 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.

स्वामी रामानंद तीर्थ यांनी निझामाच्या अन्यायाविरोधात अगोदरच लढा उभारला होता. 1935 नंतर जनतेच्या न्याय हक्कासाठी हैदराबाद संस्थानात लढे देण्यात येत होते. निझामाच्या राजवटीचे संपूर्ण व्यवस्थापन पूर्वीपासून इंग्रजांच्या हाती होते. त्याने किती खर्च करावा, कुठे खर्च करावा यावर इंग्रजांचे नियंत्रण होते. तो इंग्रजांचा बटीक होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनेक तरुण या लढ्यात उतरले होते. महात्मा गांधींच्या मार्गाने सत्याग्रह सुरु होता. या लढ्यात आर्य समाजी आणि इतर अनेक संघटनांनी हिरारीने सहभाग घेतला होता. अनेक तरुणांनी सशस्त्र क्रांती सुरू केली. गावागावातून तरुणांची भरती करण्यात येऊ लागली.

भारत छोडो आंदोलनाने निझाम भेदरला

1942 साली देशात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात इंग्रजांविरोधात भारत छोडो आंदोलन व्यापक झाले. निझाम हा इंग्रजांच्या गळ्यातील ताईत असल्याने त्याने राज्यात तातडीने असे आंदोलन होणार नाही याची दक्षता घेतली. पण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर, अंबाजोगाई, नांदेड, परभणी, हिंगोली, वसमत सह इतर आणि आंध्र प्रदेशात वरंगल, नलगोंडासह अनेक शहरात चले जावचा नारा घुमलाच. निझाम भेदरला. त्याने अनेक तरुणांना कोठडीत डांबले.

आझाद हैदराबादला कडाडून विरोध

भारताला स्वातंत्र्य मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यावर निझाम आणि इत्तेहादूल मुसलमीनच्या पुढाऱ्यांनी, विशेषतः कासीम रिजवीने आझाद हैदराबादचा नारा दिला. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपण पारतंत्र्यातच राहणार ही भावना जनतेला सहन झाली नाही. त्यानंतर रझाकार आणि जनतेने एकच संघर्ष उडाला. मराठवाड्यातील आताच्या आठही जिल्ह्यात मोठा उठाव झाला. रझाकार आणि जनतेत ठिकठिकाणी संघर्षाची ठिणगी पडली. उग्र आंदोलन सुरू झाले. रझाकारांनी जनतेवर मोठे अन्याय केले. जागोजागी दंगली सुरू झाल्या. जाळपोळ, गावोगावी लुटालूट, महिलांवरील अत्याचार वाढले. तेव्हा सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय उरला नाही

ऑपरेशन पोलोचा दणका

भारत स्वातंत्र झाल्यावर निझाम हैदराबाद संस्थानला मुस्लीमबहुल करण्याचा प्रयत्न करु लागला. त्यासाठी विविध राज्यातून विशेष रेल्वेने लोक हैदराबाद संस्थानात आणण्याचा घाट रझाकारांनी घातला. या सर्व कामात भारत सरकारचा अडथळा नको म्हणून निझामाने विलिनीकरण संबंधीच्या प्रस्तावाला नकार दिला तरी जैसे थे करारावर स्वाक्षरी केली. 26 नोव्हेंबर 1947 रोजी त्याने हा करार केला. पण जनता निझामावर भारतात विलीन होण्यासाठी दबाव टाकत होती.

विरोधकांना चिरडून टाकण्यासाठी जैसे थे कराराचे उल्लंघन रझाकारांनी सुरू केले. निझामचे सैनिक सुद्धा त्यात सहभागी होते. 26 मार्च 1948 रोजी तत्कालीन केंद्र सरकारने निझाम कराराचे उल्लंघन करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर स्टेट काँग्रेस आणि कृती समितीने रझाकार आणि निझामाने हिंदूवर सुरु असलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. या सर्व विदीर्ण परिस्थितीचा एक अहवालच प्रसिद्ध केला. त्यानंतर भारत सरकारने पोलीस कारवाईचा निर्णय घेतला. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शनला मंजुरी दिली.

13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन पोलो’ सुरु केले. सरदार पटेल यांनी भारतीय सैन्य हैदराबादला पाठवले. हैदाराबादमध्ये त्यावेळी जगातील सर्वाधिक 17 पोलो मैदाने होती. त्यामुळे या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन पोलो’ असे नाव देण्यात आले. अवघ्या पाचच दिवसात निझामाचा पाडाव झाला. या कारवाईत 1,373 रझाकार मारल्या गेले. निझामाचे 807 जवान ठार झाले. तर भारताचे 66 जवान शहीद झाले.

ही पोलीस कारवाई होती की लष्करी कारवाई यावरुन वाद झाला होता. केंद्र सरकारने हैदराबाद हे भारताचे एक संस्थान असल्याने तिथे पोलीस पाठवून कारवाई केल्याचे स्पष्ट केले होते. त्याला पोलीस ॲक्शन असे म्हटल्या गेले. परंतु, या कारवाईत लष्कराचा प्रमुख सहभाग होता.

निझामाकडे तीन रेजिमेंट होत्या. त्यात 150 च्या आसपास रणगाडे होते. एक घोडदळ, 11 इन्फ्रंटी बटालियन, तोफखाना, पायदळ आणि इतर आयुध होती. सैन्याची कमान मेजर जनरल एल एड्रोस याच्याकडे होती. तर कासिम रजवी याच्या नेतृत्वात दोन लाख रझाकार होते. त्यांच्याकडे आधुनिक बंदुकी आणि तलवारी होत्या. तर भारतीय सैन्य दलात पायदळ, तोफखाना आणि आर्मर्ड युनिट होते. 40 हजार जवानांनी या कारवाईत सहभाग घेतला. रझाकारांच्या टोळ्या आणि निझामच्या लष्कराविरोधात लष्करी अधिकाऱ्यांनी ऑपरेशन कबड्डी राबवले. फर्स्ट म्हैसूर इन्फंट्री, म्हैसूर लान्सर्स, मेवाड इन्फंट्री, फर्स्ट ग्वालियर इन्फंट्री, फोर्थ ग्वालियर इन्फंट्री, राजाराम रायफल्स या दलांनी मोर्चा सांभाळला. कारवाई सुरु झाल्याच्या 109 तासानंतर निझाम शरण आला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले. मराठवाड्यातील जनतेला भारतीय स्वातंत्र्यानंतर एक वर्ष 32 दिवसांनी गुलामगिरीतून मुक्ती मिळाली. पाकिस्तानचे भारतातंर्गत एक राष्ट्र तयार करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.