Maharashtra Breaking News LIVE 28 December 2024 : सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी, प्राजक्ता माळी
Maharashtra Political News LIVE in Marathi : बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा निघणार आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या घटनेने बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
आमचं कलाक्षेत्र बदनाम नाही, अशा माणसांमुळे बदनाम, प्राजक्ता माळी
आमचं कलाक्षेत्र बदनाम नाही, परंतू अशा माणसांमुळे कलाक्षेत्र बदनाम होत आहे असा आरोप अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केला आहे.
-
सुरेश धस यांनी माझी माफी मागावी, प्राजक्ता माळी
वैयक्तिक राजकारणासाठी अशा प्रकारे कलाकारांची बदनामी करणे योग्य नाही.महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींना हे शोभणारे नाही. सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली आहे.
-
-
वैयक्तिक राजकारणासाठी महिलांचा वापर करणे बंद करा, प्राजक्ता माळी
वैयक्तिक राजकारणासाठी महिला कलाकारांचा वापर करणे बंद करावे असाही टोला अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी लगावला आहे.
-
राजकारणात महिला कलांकारांना का ओढता – प्राजक्ता माळी
सुरेश धस लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना राजकारण करायचे आहे तर करावे परंतू एका महिला कलाकारांना का ओढवे असा सवाल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केला आहे.
-
बीड-परभणी: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दौरा
केंद्रीय मंत्री रामदास आठवले 30 तारखेला सकाळी 10 वा. मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत,त्यानंतर ते परभणीला जाऊन पीडीत सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबाची घेणार भेट आहेत.
-
-
मुख्यमंत्री सांगतात खंडणीत दोषी, मग अटक का नाही?
संतोष देशमुख प्रकरणाचा मोहरक्या खंडणीत दोषी आहे. हे कोण बोलले, मुख्यमंत्री त्यांच्या भााषणात बोलतात. मग त्या मोहरक्याला अटक का झाली नाही. हा प्रश्न आहे, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले.
-
तर संभाजीराजे बीडचे पालकत्व घेणार
छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरुन काढण्याची मागणी केली. त्यांना पालकमंत्री केले तर मी बीडचे पालकत्व घेणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले.
-
-
आता तोपर्यंत मागे हटणार नाही- मनोज जरांगे
पुढच्या काळात सावध राहा. आरोपी सापडणे काही मोठी गोष्ट नाही. संतोष भैय्या यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण मागे हटायचे नाही. आपल्या लेकारला न्याय मिळाला पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
-
सुरेश धस अण्णाच एकटे पुरे- मनोज जरांगे
तुम्ही नाव घेत नाही. मी लढत नाही. तुम्हाला काय माहीत आहे का मी लढत नाही. मीच एकट्याने का करावे. सुरेश धस अण्णाच एकटे काफी आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
-
माझ्या जातीवर अन्याय करणारास सोडणार नाही- मनोज जरांगे
मी काय करतो, यापेक्षा समाजाने काय ठरवले, हे महत्वाचे आहे. तेच मी करणार नाही. माझ्या जातीवर कोणी अन्याय केला तर मी त्याला सोडत नाही, मग तो कोणीही असो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
-
लोकसभेत बोगस मतदान झाले
लोकसभेत ७५ हजार मते बोगस केले. त्यानंतर मनोज पाटील यांच्या आशीर्वादामुळे मी विजयी झालो, असे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.
-
संतोष देशमुख मारेकऱ्यास फाशी होणार- खासदार सोनवणे
आपण सर्व जण लढत आहोत. परंतु फक्त आश्वासन मिळाले आहे. चौथा व्यक्ती अटक झाला की त्याने आत्मसमर्पण केले आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यास फाशी होणारच, असे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले.
-
आता मी शांत बसणार नाही- जितेंद्र आव्हाड
माझ्या बहिणीचे कुंकू पुसले गेले आहे. आता मी शांत बसणार नाही. माझा बाप २२ वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय. मी हमालाचा नातू आहे. मला गरीबी शिकवू नका. आम्ही लढून पुढे आलोय. अजून लढतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
-
तुम्ही वाल्मिकी कशाला म्हणता. तो वाल्या आहे- जितेंद्र आव्हाड
संतोष देशमुख कोणत्याही जातीचा नाही. बीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सोशालिस्ट निवडून आले होते. समाजवादी विचाराचे बबनराव ढाकणे विजयी झाले. वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी या ठिकाणचं नेतृत्व केलं. या ठिकाणी जातीचा प्रश्नच आला नाहीमहाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण कुठंपर्यंत कुठपर्यंत गेलं हे पाहून आश्चर्य वाटतं. याला तुम्ही वाल्मिकी कशाला म्हणता. तो वाल्या आहे. त्रेता युगात वाल्याचा वाल्मिकी झाला. आता वाल्मिकीचा वाल्या झाला. कसला वाल्मिकी कराड. तो वाल्या आहे.
-
पंकजाताई तुम्ही संतोष देशमुखच्या घरी का नाही गेलात?- सुरेश धस
पंकजाताई तुम्ही संतोष देशमुखच्या घरी का गेले नाहीत? पंकजाताई तुम्हाला चांगली माणसं जमत नाही. आम्ही जी हुजूर करणार नाही. तुम्हाला तुमचा याचं उत्तर द्यावं लागेल, आमदार सुरेश धस यांचा घणाघाती टीका केली आहे.
-
माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या- वैभवी देशमुख
माझ्या वडिलांचा जन्म इथेच आनंद हॉस्पिटलमध्ये झाला होता. माझ्या पणजीने त्यांचं नाव संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं. मी विनंती करते माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांची हत्या कशी झाली तुम्हाला माहीत आहे. ते समाज सेवक होते. शेवटपर्यंत ते समाज सेवा करत होते. दलित समाजातील व्यक्तीची मदत करताना त्यांची हत्या झाली.. आरोपींना शिक्षा होईपर्यंत लढा देणार आहे. तुम्ही आज माझ्या कुटुंबासोबत मोठ्या संख्येने उपस्थित आहात. तसेच माझ्यासोबत राहा, अशी भावना वैभवी देशमुख यांनी केली.
-
खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडला अटक झाली नाही- प्रकाश सोळंके
वाल्मिक कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पण त्याला अजूनही अटक झाली नाही, असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केली आहे. वाल्मिक कराडच्या मागे धनंजय मुंडेंचा हात आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्यावं.
-
वाल्मिक कराडला मंत्री धनंजय मुंडे यांचं संरक्षण- संदीप क्षीरसागर
वाल्मिक कराडला अटक झाली पाहीजे. पण वाल्मिक कराडला मंत्री धनंजय मुंडे यांचं संरक्षण आहे. तसेच धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली.
-
वाल्मिकी कराडला अटक करा, संदीप क्षीरसागर यांची मागणी
वाल्मिकी कराडला अटक करा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ही मागणी केली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
-
सरकार मध्ये अनेक मंत्री डागाळलेले, राज्य सुरक्षित नाही, सुरेश धस यांचा आरोप
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये अनेक मंत्री डागी आहेत. हे सरकार डागी आहेत, असं म्हणणं वावग ठरणार नाही. सर्व ठिकाणी गुंडा राज, जंगल राज सुरू आहे. बीड प्रकरण सत्ता पक्ष आरोप करत आहे. महाराष्ट्र भयभीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही घटना का लपवत आहे, महिला सुरक्षित नाही, राज्य सुरक्षित नाही, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला
-
बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते मोर्चात सहभागी, हजारो लोक रस्त्यावर
बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरले आहे. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चा हजारो लोक सहभागी झाले आहे.
-
आरोपीला फाशी द्या
बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने मोर्चात नागरिकांची उपस्थिती होती. आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा आशयाची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
-
मोर्चाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन
छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
-
अनाधिकृत वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना ATS ने घेतले ताब्यात
जालन्याच्या भोकरदन मधील अन्वा येथून स्टोन क्रेशर वर कामाला असणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलंय.हुमायून कबीर अली अहमद, माणिक खान जन्नोदिन खान, इमदाद हुसेन मोहम्मद अली हुसेन अशी या तीन तरुणांची नावे आहेत. नाशिक आणि छत्रपती संभाजी नगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई करून या तरुणांना ताब्यात घेतलाय. हे तिघेही तरुण अवैधपणे कागदपत्राशिवाय राहत असून घुसखोरी करून भारतात आले असल्याच तपासात उघड झालं आहे.
-
तहसीलदारांना दिले निवेदन
दोन मुलींवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी राजगुरुनगर शहरातून निघालेला मोर्चा खेड तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चातील नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. यानंतर तहसीलदार याना निवेदन देण्यात आले.
-
१ जानेवारी २०२५ शौर्यदिनी पारंपरिक कार्यक्रम
बुधवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी शौर्यदिन निमित्त विजयस्तंभावर मानवंदना अभिवादन पारंपरिक कार्यक्रामांचे कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा समिती अध्यक्ष सर्जेराव वाघमारे रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांच्यावतीने नियोजन केले जाणार आहे
-
अंजली दमानिया यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाची परवानगी
ठिय्या आंदोलनासाठी अंजली दमानिया यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकरी कार्यालय परिसरात आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
-
मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर अनेक नेते उपस्थित आहेत.
-
अलविदा मनमोहन सिंग
दिल्लीच्या निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे. भाजपकडून अमित शाह, राजनाथ सिंह अंत्यविधीला उपस्थित आहेत. तिन्ही दलांकडून मनमोहन सिंग यांना सलामी देण्यात आली.
-
पुणे राजगुरुनगर अत्याचार प्रकरणी मोर्चा
दोन मुलींवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे राजगुरुनगर शहरातून निघालेला मोर्चा खेड तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी झालेल्या महिला, पुरुष मनोगत व्यक्त करत आहेत. यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार.
-
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड बिनधास्त फिरतोय, संभाजीराजेंचा संताप
“वाल्मिक कराड बिनधास्त फिरतोय. त्याचे आश्रयदाते यांचा राजीनामा का घेत नाही? मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी सांगितलं होतं, यांना मंत्रिपद देऊ नका. यांना मंत्रिपद दिलं, तर न्याय देण्यात गडबड होऊ शकते” अशा शब्दात संभाजी राजे यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा रोख धनंजय मुंडेंकडे होता.
-
Santosh Deshmukh Murder Case : बीडमध्ये कडकडीत बंद, 400 पोलीस तैनात
सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आज बीडमध्ये मूक मोर्चा. सकाळपासूनच सर्व बाजारपेठा बंद. शाळा, महाविद्यालये देखील बंद. अत्यावश्यक सेवा वगळता बीड कडकडीत बंद राहणार. शहरात येणारी सर्व वाहतुक वळवली. मूक मोर्चासाठी 400 पोलीस कर्मचारी तैनात. 4 dysp, एक अपर पोलीस अधीक्षक देखरेखीला. राज्य सुरक्षा बलाच्या ही दोन तुकड्या. आरसीपीच्या 6 प्लाटून तैनात.
-
Santosh Deshmukh Murder Case : मूक मोर्चासाठी गर्दी जमायला सुरुवात
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड शहरात मूक मोर्चा. मोर्चात सहभागी होण्यासाठी अनेक महिला दाखल. हातात न्यायाचे फलक घेऊन महिला दाखल. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात गर्दी व्हायला सुरुवात.
-
Anjali Damania : अंजली दमानिया यांचा धक्कादायक खुलासा
“काल रात्री मला फोन आला. कॉल करणाऱ्यांनी मला व्हॉइस मेसेज टाकले. त्या व्यक्तीने सांगितले ते तीन फरार आरोपी मिळणार नाहीत. त्यांचा मर्डर झाला आहे. या संदर्भात ही माहिती बीड पोलीस अधीक्षक यांना दिली आहे. सात पैकी तिघांची हत्या झाल्याचं कॉल करणाऱ्यांनी सांगितले. हे खरे आहे की खोटे आहे, मला काही माहीत नाही” असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.
-
Prajakta Mali : प्राजक्ता माळी आज पत्रकार परिषद घेणार
मराठी चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी आज पत्रकार परिषद घेणार आहे. आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याला प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेद्वारे उत्तर देणार आहेत. माझी भूमिका मी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांसमोर मांडणार असल्याचे प्राजक्ता माळी यांनी सांगितले. मात्र, पत्रकार परिषदेची वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
-
Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या तक्रारीबद्दल रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
“अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी अद्याप महिला आयोगाकडे तक्रार केलेली नाही. प्राजक्ता माळी यांनी अद्याप आमच्याशी कुठलाही संपर्क साधलेला नाही. प्राजक्ता माळी यांनी जर आमच्याकडे तक्रार केली तर त्याची दखल घेतली जाणार. बीडच्या घटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सखोल चौकशी करणार” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
-
Beed Protest March : राजकीय नेत्यांनी कुठेही भांडवल केले नाही – धनंजय देशमुख
“आलेले सर्व लोक मला न्याय देण्यासाठी येत आहेत. आम्हाला मदत करण्याची लोकांची प्रामाणिक भावना आहे. कोणी राजकारण करत असेल, तर ते त्यांच्या ठिकाणी असु दे मला काही हरकत नाही. पण मला मदत करताना कोणीही राजकारण करत नाहीत असे मला वाटते. राजकीय नेत्यांनी कुठेही भांडवल केले नाही” असं संतोष देखमुख यांचे बंधु धनंजय देशमुख म्हणाले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे. हा सर्वपक्षीय मोर्चा असणार आहे. आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनावणे, आमदार प्रकाश सोळंके, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आणि आमदार जितेंद्र आव्हाड या मोर्चात सहभागी होणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा निघणार आहे. माळीवेस, सुभाष रोड, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे चौक, बीड बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शेवट बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाच समापन होईल. दरम्यान आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी काल अभिनेत्री प्राजक्ता माळीच नाव घेतलं. त्याचेही पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. प्राजक्ता माळी आमदार धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार करणार असल्याची चर्चा आहे. एकूणच राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
Published On - Dec 28,2024 10:48 AM