मला वाटलं लोक मला विसरतील, माझ्या कुटुंबाने खूप काही गमावलंय… ‘तो’ अनुभव सांगताना संजय राऊत गहिवरले

माझी प्रकृती अजूनही खराब आहे. तुरुंगातही होती. आजही आहे. तुरुंगात राहणं आनंदाची गोष्ट नसते. भिंतीशी बोलावं लागतं. भिंतीशी एकांतात बोलावं लागतं. सावरकर दहा वर्ष तुरुंगात कसे राहिले.

मला वाटलं लोक मला विसरतील, माझ्या कुटुंबाने खूप काही गमावलंय... 'तो' अनुभव सांगताना संजय राऊत गहिवरले
मला वाटलं लोक मला विसरतील, माझ्या कुटुंबाने खूप काही गमावलंय... 'तो' अनुभव सांगताना संजय राऊत गहिवरले Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 11:45 AM

मुंबई: तुरुंगात राहणं ही चांगली गोष्ट नाही. जगातील कोणतीही व्यक्ती तुरुंगात जावून मजेत राहते असं वाटत असेल तर तसं नाही. तुरुंगात राहणं फार कठिण आहे. त्यामुळेच तुरुंगाची संकल्पना तयार करण्यात आली आहे, असं सांगतानाच माझ्या कुटुंबाने खूप काही गमावलं आहे. माझ्या पक्षाने खूप काही भोगलं आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. हे सांगताना राऊत गहिवरून गेले होते.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुरुंगातील अनुभवावर भाष्य केलं. आता आलो आहे. लोकांनी माझं जल्लोषात स्वागत केलं. प्रेम दिलं. मला वाटलं लोक मला विसरून जातील. पण मी कालपासून आणि आजही पाहत आहे. लोक माझं स्वागत करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आता आलो आहे. लोकांनी माझं जल्लोषात स्वागत केलं. प्रेम दिलं. मला वाटलं लोक मला विसरून जातील. पण मी कालपासून आणि आजही पाहत आहे लोकांनी भरभरून स्वागत केलं. प्रेम दिलं, असंही ते म्हणाले.

माझी प्रकृती अजूनही खराब आहे. तुरुंगातही होती. आजही आहे. तुरुंगात राहणं आनंदाची गोष्ट नसते. भिंतीशी बोलावं लागतं. भिंतीशी एकांतात बोलावं लागतं. सावरकर दहा वर्ष तुरुंगात कसे राहिले? लोकमान्य टिळक सहा वर्ष कसे राहिले? वाजपेयी दोन वर्ष तुरुंगात कसे राहिले? याचा मी विचार करत होतो. राजकारणात तुरुंगात जावं लागतं. मीही गेलो, असं त्यांनी सांगितलं.

कुणालाही चुकीच्या आरोपाखाली तुरुंगात ठेवणं हे चूकच आहे. देशमुखांच्या बाबतीत कोर्टाने जे निरीक्षण दिलं ते वाचण्यासारखं आहे. कोर्टाच्या आदेशाने न्यायावरचा विश्वास वाढला आहे. तुरुंगातील अनुभव सांगण्यासारखा नाही. तुरुंगात राहायला लागणं वाईट आहे, असं त्यांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी एका भाषणात टीका करताना सांगितलं होतं, राऊतांना अटक होईल. त्यांनी एकांतात स्वत:शीच बोलण्याची प्रॅक्टीस करावी. मला त्यांना सांगायचं आहे. राजकारणात शत्रू तुरुंगात जावा अशी भावना असू नये. माझ्या एकांताचा काळ सत्कारणी लावला, असं सांगतानाच सावरकरांपासून ते आणीबाणीच्या काळापर्यंतचे अनेक नेते तुरुंगात होते. माझी अटकही बेकायदेशीर होती, असं ते म्हणाले.

माझी प्रकृती अजूनही खराब आहे. तुरुंगातही होती. आजही आहे. तुरुंगात राहणं आनंदाची गोष्ट नसते. भिंतीशी बोलावं लागतं. भिंतीशी एकांतात बोलावं लागतं. सावरकर दहा वर्ष तुरुंगात कसे राहिले. लोकमान्य टिळक सहा वर्ष कसे राहिले. वाजपेयी कसे राहिले. याचा मी विचार करत होतो. राजकारणात तुरुंगात जावं लागतं. मीही गेलो, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....