मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) का झाले? देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री कसे होऊ शकतात? शिंदेंच्या आदेशानुसार फडणवीस (Devendra Fadanvis) काम करणार? नेमक्या कुणाच्या आदेशावरून हे घडलं? फडणवीस नाराज आहेत का? हे आणि असे अनेक प्रश्न मनात घेऊन अवघी महाराष्ट्रातील (Maharashtra politics) जनता झोपी गेली असताना रात्रीतून आणखीही काही घडामोडी घडत होत्या. त्यातलीच महत्वाची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रात्री आठच्या सुमारास फडणवीस-शिंदेंचा शपथविधी झाला. त्यानंतर बारा वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी अशी एकाएकी फडणवीसांची भेट का घेतली, यावर आता चर्चा सुरु आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर धनंजय मुंडे रात्री बारा वाजेच्या सुमारास गेले होते, असे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे. तेथे मुंडे जवळपास अर्धा तास थांबले. दोघांमध्ये घरात कय बोलणं झालं, याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मुंडे यांच्या या भेटीमुळे शिवसेनेती बंडखोरीचं वादळ राष्ट्रवादीतही घुसू पाहतंय का, अशा चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. विधानपरिषद निवडणुकीतही यावर शंका घेतली गेली. त्यामुळे राष्ट्रवादीतूनही बंडखोरांचा गट बाहेर पडू शकतो का, अशा शक्यतांना विचार केला जातोय.
ठाकरे सरकारमधील मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध जगजाहीर आहे. त्यातच एकनाथ खडसे आणि फडणवीसांमधील द्वंद्वही सर्वांना माहिती आहे. एकनाथ खडसे हे फडणवीस सरकारमध्ये विरोधी बाकांवर बसतील, अशा चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे धनंजय मुंडे यांनी वरील सर्व कनेक्शनमधून काही नवा प्रस्ताव फडणवीसांसमोर ठेवला तर नाही ना, अशी चर्चा आता सुरु आहे.
दरम्यान, काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. यावर वादंग उठला आहे. शिवसेनेने हा शपथविधीच बेकायदेशीर असल्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. तसेच शिंदे यांना देण्यात आलेला बहुमत चाचणीचा आदेश पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच तुमचे मत 11 जुलै रोजीच्या सुनावणीत मांडा, असेही कोर्टाने सांगितले.