Sanjay Raut : फडणवीसांनी झमेल्यात पडू नये, त्यांच्याबद्दल आदर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
शिवसेनेतील बंडखोरी हा पक्षातला विषय आहे. आतापर्यंत कुणी कुणाला पाठिंबा दिलेला नाही. असे असताना विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर या प्रकरणात लक्षच घालू नये. याबाबतचा सल्ला देताना राऊत ऐवढेही म्हणाले यापूर्वी सकाळचा शपथविधी झाला होता आता संध्याकाळचा होऊ नये याची त्यांनी खबरदारी घ्यावी.
मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या बंडाने गेल्या चार दिवसांपासून राज्याचे राजकारण हे ढवळून निघत आहे. आता एकनाथ शिंदे गटावर शिक्कामोर्तब झाल्याने (BJP) भाजपाच्या गोटातही हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचअनुशंगाने देवेंद्र फडणवीस यांनी आता बैठकांचे सत्र सुरु केले आहे. त्याला (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी झमेल्यात पडू नये. ते एक राजकारणातले चांगले खेळाडू असले तरी या प्रकरणापासून त्यांनी दूरच रहावे असा सल्ला देत त्यांनी अजित पवार आणि फडणवीस यांचा पहाटे झालेल्या शपथविधीचीही आठवण करुन दिली. मात्र, हा सल्ला देत असताना त्यांच्याबद्दल आदर असल्याचे म्हणताच अनेकांच्या भूवया मात्र उंचावल्या होत्या.
एक बार सुबह का हो गया ये शाम का होगा..!
शिवसेनेतील बंडखोरी हा पक्षातला विषय आहे. आतापर्यंत कुणी कुणाला पाठिंबा दिलेला नाही. असे असताना विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर या प्रकरणात लक्षच घालू नये. याबाबतचा सल्ला देताना राऊत ऐवढेही म्हणाले यापूर्वी सकाळचा शपथविधी झाला होता आता संध्याकाळचा होऊ नये याची त्यांनी खबरदारी घ्यावी. त्यामुळे आता जी उरली-सुरली प्रतिष्ठा आहे ती सांभाळा असे म्हणून महाविकास आघाडी सरकारबाबत आपण किती ठाम आहोत हेच राऊत यांनी दाखवून दिले आहे. आतापर्यंत बंड आणि त्यावर तोडगा इथपर्यंत ठिक होते पण यामध्ये भाजपाची एन्ट्री म्हणले की संजय राऊत यांच्याकडून जेरदार टिकास्त्र केले जात आहे.
निवडणुकांमध्ये सामना आहेच की
सध्याचे बंडखोर आमदारांचे प्रकरण हे वेगळे आहे. यामध्ये हस्तक्षेप केला तर फसताल. असा थेट सल्लाच राऊतांनी देवेंद्र फडवणवीस यांना देऊन हे दिसतंय तेवढे सोपे नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामधून तुमच्या हाती तर काही लागणार नाही पण नाच्चकी मात्र होईल. यामुळे निवडणुकांची गोष्ट वेगळी आहे. त्यावेळी तर सामना होईलच पण यामध्ये लक्ष घातले तर तुमच्या प्रतिष्ठेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राजकीय विरोधक मात्र आदर कायम
सध्याच्या ओढावलेल्या परस्थितीपासून भाजपाने आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दूरच राहिलेले बरे. जरी आमच्यामध्ये राजकीय मतभेद असले तरी त्यांच्याबद्दल आदर असल्याचे म्हणत राऊतांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे पडद्यामागे काहीतरी शिजतंय हेच राऊतांना यामधून सांगायचे होते. पण सल्ला देण्याबरोबरच त्यांच्याबद्दल आदर असल्याचेही ते म्हणाले आहेत.