Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekanath Shinde : भाजपच्या गोटात भेटीगाठी वाढल्या, गोव्यात ज्योतिरादित्य अलर्ट, महाराष्ट्रात महाजन, गीता जैन ‘सागर’वर, फडणवीसांची पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा

महाराष्ट्रात भाजपकडून हलचाली सुरू झाल्या असून गिरीष महाजन 'सागर' बंगल्यावर दाखल झाले आहेत.

Ekanath Shinde : भाजपच्या गोटात भेटीगाठी वाढल्या, गोव्यात ज्योतिरादित्य अलर्ट, महाराष्ट्रात महाजन, गीता जैन 'सागर'वर, फडणवीसांची पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा
घडामोडींना वेगImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 11:23 AM

मुंबई : शिवसेनेच नेते एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील सरकार अल्पमतात येण्याची भीती आहे. तर दुसरीकडे भाजपकडून (BJP) सत्तास्थापनेची तयारी सुरू असल्याचं बोललं जातंय. आधी एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांना सुरतमध्ये नेलं. त्यावेळी त्याठिकाणी काही भाजपचे नेते दिसून आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि शिवसेनेच्या बंडखोरांची भेट होणार असल्याची माहिती आली. ही बातमी येत नाही तर लगेच भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन यामध्ये भाजपचा कोणताही सहभाग नसून हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हटलं. मात्र, आज भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं चित्र आहे. एकीकडे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे गुवाहाटी विमानतळावर लक्ष ठेवून आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपकडून हलचाली सुरू झाल्या असून गिरीश महाजन ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. यासोबतच गिता जैन देखील ‘सागर’वर आल्या आहेत. तर भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस कुठे आहेत?

भाजपने महाराष्ट्रातील प्रभावी नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला गेल्याची माहिती होती. त्यानंतर ते कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे फडणवीस नेमके कुठे आहेत, असा प्रश्न सध्या विचारला जात होता. आता एक बातमी आली आहे. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

गोव्याकडे राज्यपालपदाचा कार्यभार?

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या खडामोडी सुरू असताना राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा नवा पेच उभा राहण्याची शक्यताय. अशातच गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याकडे महाराष्ट्राचा कारभार काही काळासाठी दिला जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे हे गोव्याला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर दुसरीकडे गोवा हे मुंबईच्या तुलनेने अधिक सुरक्षित असल्याचंही जाणकारांनी म्हटलंय. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचं केंद्र सूरत, आसाम यानंतर गोवा असणार की काय, अशी शक्यताय.

भाजपची काय भूमिका?

भाजप शिंदे यांच्या बंडावर थेटपणे काहीही बोलताना दिसत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात भाजपचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचा हा अंतर्गत मुद्दा असल्याचंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणालेत. दर भाजपचे दुसरे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार देखील यावर बोलले असून शिवसेना हा आमचा जुना मित्र असल्याचं म्हटले आहे.

नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला.
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर
पतीसह तिघांकडून मारहाण, विवाहितेचं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर.
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?
सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, 'ती' महिला कोण?.