मुंबई: 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रत्येक भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मी पुन्हा येईन असा नारा दिला होता. त्यामुळे त्यांची खिल्लीही उडवली होती. त्यावरून राजकीय नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली होती. सोशल मीडियातूनही फडणवीस यांना ट्रोल केलं गेलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आता सरकार स्थापन करता येणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे बंडखोर आणि भाजप (bjp) यांची राज्यात सत्ता येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताच देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत. यावेळी ते राज्यपालांकडे सत्ता स्थापण्याचा दावा करतील, असं सांगितलं जात आहे.
2019मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारात भाषण करताना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असा नारा दिला होता. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केल्याने फडणवीसांचं सत्तेत येण्याचं स्वप्न धुळीस मिळालं होतं. मात्र, आता शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आलं. आठ दिवस झाले तरी आमदारांनी बंड मागे न घेतल्याने अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा सूत्रे स्वीकारणार आहेत.
मला मुख्यमंत्रीद सोडण्याची खंत अजिबात नाहीय. मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा होती, नव्हती तुम्हाला माहती आहे. तुम्हाला ठाकरे कुटुंब माहीत आहे. आम्ही हिंदूंसाठी काम करतो. मी सगळ्यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. तुम्ही प्रेम दिलं, आशीर्वाद दिला. मी घाबरणारा नाही. उद्या कारण नसताना शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचं धनी व्हायचं नाहीये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळ दिल. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे, असंही ते म्हणाले.
न्याय देवतेने निकाल दिलाय. फ्लोअर टेस्ट करण्याचा जो निर्णय. राज्यपालांनी 24 तासात लोकशाहीचे पालन केले पण 12 विधानपरिषद यादी आताही निर्णय घ्यावा. मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले आम्ही बाहेर पडतो. काल पण आवाहन केले तुमची नाराजी कोणावर आहे? ती सुरतला गुवाहटीला जाऊन सांहण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवंय. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत. इतक नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्या मध्ये येऊ नये. नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही, असं त उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही हपालेले होऊन जात नाही. मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उद्धव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाहि मुस्लिमांनि पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा. मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो, असंही ते म्हणाले.