Imtiaz Jalil : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत MIMचा मार्गारेट अल्वांना पाठिंबा, इम्तियाज जलील यांची माहिती

काँग्रेसच्या यूपीएप्रणित आघाडीने उपराष्ट्रपती पदासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्या मार्गारेट अल्वा यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं मार्गारेट अल्वा यांचा थेट मुकाबला भाजपप्रणित एनडीए आघाडीचे उमेदवार जगदीश धनखड यांच्याशी होईल.

Imtiaz Jalil : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत MIMचा मार्गारेट अल्वांना पाठिंबा, इम्तियाज जलील यांची माहिती
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत MIMचा मार्गारेट अल्वांना पाठिंबा
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 8:24 PM

नवी दिल्ली : नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवासस्थानी झालेल्या बैठकीत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. जलील म्हणाले, उपराष्ट्रपदीपदासाठी (Vice President) दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक होती. मार्गारेट अल्वा या अल्पसंख्याकांशी संबंधित आहेत. महिला उमेदवार आहेत. त्यामुळं आमच्या पक्षात विचारविनिमय झाला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मार्गारेट अल्वा या यूपीएच्या उमेदवार आहेत. दिल्लीत शरद पवारांच्या घरी विरोधी पक्षाची बैठक झाली. बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा उपस्थित होत्या. शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) या उपस्थित होत्या. विरोधी पक्षाचे महत्वाचे नेते या बैठकीत उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ

कोण आहेत मार्गारेट अल्वा

काँग्रेसच्या यूपीएप्रणित आघाडीने उपराष्ट्रपती पदासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्या मार्गारेट अल्वा यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं मार्गारेट अल्वा यांचा थेट मुकाबला भाजपप्रणित एनडीए आघाडीचे उमेदवार जगदीश धनखड यांच्याशी होईल. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सहा ऑगस्टला होणार आहे. भारतीय राजकारणात अनेक दशकं काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा कार्यरत आहेत. यूपीए सत्तेत असेपर्यंत ऑगस्ट 2014 पर्यंत त्या गोव्याच्या राज्यपाल होत्या. त्यापूर्वी त्यांनी गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, अशा राज्यांचे राज्यपालपद भूषविले आहे. त्यापूर्वी अल्वा या केंद्रीय मंत्रिमंडळातही होत्या.

हे सुद्धा वाचा

भाजपकडून जगदीश धनखड यांना उमेदवारी

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या नावावर चर्चा झाली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जगदीश धनखड यांच्या नावाची घोषणा केली. धनखड हे पश्चिम बंगाच्या राज्यपाल होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी जगदीश धनखड यांच्याशी संघर्ष होत राहिला. भाजपनं धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. धनखड हे जाट समाजाचे आहेत. पुढच्या दीड वर्षात राजस्थानात निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं त्यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.