गुलाबराव पाटलांच वादगस्त वक्तव्य, आता ओवैसीला म्हटलं…
"इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितलं होतं",
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (minister gulabrao patil)यांनी केलेले वक्तव्य पुन्हा चर्चेत आलंय. “ओवैसीच्या (asaduddin owaisi)कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितलं होतं” असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. त्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut )यांच्यांवरही जोरदार हल्ला चढवलाय.
हिंदू जनआक्रोश मोर्च्यात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, खुर्चीपेक्षा मला धर्म महत्त्वाचा आहे. आम्ही आधी हिंदू आहोत. त्यानंतर मंत्री…आम्हाला खुर्ची देणारे पण तुम्हीच खुर्ची काढणारे पण तुम्हीच आहात. त्यामुळे आम्हाला धर्म महत्वाचा आहे. आम्ही कुणाच्या धर्माला दुखवत नाही, पण आमच्या धर्माबाबत कोणी वाकडी नजर करत असेल तर सहन करणार नाही. “इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितलं होतं”,
संजय राऊतांवर केला हल्लाबोल
संजय राऊत नेहमी एकनाथ शिंदे यांच्यांवर टीका करतात. तो संदर्भ घेत गुलाबराव म्हणले एकनाथ शिंदे यांनी दाढीवर जरी हात ठेवला तरी संजय राऊत आडवा पडला असता. खासदार झाला नसता.त्यांनी जी ४१ मतं मिळाली ती फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मिळाली असा दावाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला आहे.