फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली : हसन मुश्रीफ

कोरोना काळात अधिकाऱ्यांच्या बदलीचं सत्र सुरु असल्याने सरकारवर टीका केली जात आहे. (Minister Hasan Mushrif on IPS Officer Transfer) 

फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली : हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: Sep 03, 2020 | 1:30 PM

मुंबई : “माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली केली,” असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. ठाकरे सरकारकडून पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 40 हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोना काळात अधिकाऱ्यांच्या बदलीचं सत्र सुरु असल्याने सरकारवर टीका केली जात आहे. (Minister Hasan Mushrif on IPS Officer Transfer)

“काही अधिकारी फडणवीस सरकार काळातील ते खाल्या मिठास जगात होते. यामुळेच त्यांना बदललं,” अशी टीका मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांचं नाव न घेता केली.

दरम्यान नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झालीे आहे. नांगरे पाटील यांच्या जागी दीपक पांडे यांची वर्णी लागली आहे. तर नाशिक परिमंडळचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची मुंबईत विशेष पोलीस तुरुंग महानिरीक्षकपदी (सुधार सेवा) बदली झाली आहे, तर प्रताप दिघावकर यांना नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोरोना संकट वाढतंय, म्हणून धार्मिक स्थळं बंद 

तसेच राज्यातील धार्मिक स्थळं सुरु करावी यासाठी आंदोलन केलं जातं आहे, यावर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. “मंदिर-मशिद सुरु करावे म्हणून आंदोलन केले जात आहे. पण कोरोना संकट वाढत आहे, त्यामुळे बंद ठेवले, आता ई-पास काढला. लोक प्रवास करतील. मात्र अजून कोरोनाची भीती आहे. काही दिवस लोकांनी थोडा संयम बाळगावा,” असे हसन मुश्रीफ म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री, सह्याद्री येथून चांगले काम करत आहे. राज्यातील समस्या सोडवत आहे. विरोधक विनाकारण सीएम यांना बदनाम करत आहेत,” असे मुश्रीफ म्हणाले.

“ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या मालमत्तेवर कर्ज मिळेल. त्यामुळं ग्रामीण लोकांना दिलासा मिळेल. कोरोना संकटात आर्थिक व्यवहार करायचे असेल. तर कर्ज घेता येईल,” असा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. (Minister Hasan Mushrif on IPS Officer Transfer)

संबंधित बातम्या : 

पोलिस दलात मोठे फेरबदल, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या 12 उपायुक्तांच्या बदल्यांना गृहमंत्र्यांची तीन दिवसात स्थगिती

यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये....
यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये.....
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील 'या' 10 महत्त्वाच्या घोषणा
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील 'या' 10 महत्त्वाच्या घोषणा.
'...म्हणून मुंडेंना आधार दिला', महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले
'...म्हणून मुंडेंना आधार दिला', महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले.
गडाआडून मुंडेंचा दबाव? तर महंत नामदेव शास्त्रींचा 'राजकीय' इशारा काय?
गडाआडून मुंडेंचा दबाव? तर महंत नामदेव शास्त्रींचा 'राजकीय' इशारा काय?.
भगवानगडाचं 'राजकीय' दार तब्बल 11 वर्षांनी कसं उघडलं?
भगवानगडाचं 'राजकीय' दार तब्बल 11 वर्षांनी कसं उघडलं?.
देशाचा 'अर्थ' संकल्प कसा असेल? थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी क्लिक करा...
देशाचा 'अर्थ' संकल्प कसा असेल? थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी क्लिक करा....
हत्या महाराष्ट्रात, मृतदेह गुजरातमध्ये..धोडींच्या हत्येचा असा घटनाक्रम
हत्या महाराष्ट्रात, मृतदेह गुजरातमध्ये..धोडींच्या हत्येचा असा घटनाक्रम.
Union Budget : आज अर्थसंकल्प सादर करणार, 'या' 8 घोषणा होण्याची शक्यता
Union Budget : आज अर्थसंकल्प सादर करणार, 'या' 8 घोषणा होण्याची शक्यता.
राज्यपाल बनवण्याच्या चर्चेवर भुजबळ स्पष्टच म्हणाले, '...तोंडाला कुलूप'
राज्यपाल बनवण्याच्या चर्चेवर भुजबळ स्पष्टच म्हणाले, '...तोंडाला कुलूप'.
'उदय सामंतांचंच ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही', राऊतांचा टोला
'उदय सामंतांचंच ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही', राऊतांचा टोला.