ध्वजारोहणानंतर परतताना मध्येच ब्रेक, बंद धाब्याबाहेर बसून मंत्री शंकरराव गडाखांनी डबा खाल्ला
कॅबिनेट मंत्री असून शंकरराव गडाख यांनी घराचा जेवणाचा डबा उघडून खाटेवर बसून जेवण (Minister Shankarrao Gadakh Eat Tiffin at roadside dhaba) केले.
शिर्डी : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन दिवस उस्मानाबाद दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपून अहमदनगरकडे परत जात असताना त्यांनी एका बंद असलेल्या धाब्यावर जेवण केले. विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्री असून गडाख यांनी घराचा जेवणाचा डबा उघडून खाटेवर बसून जेवण केले. याबाबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Minister Shankarrao Gadakh Eat Tiffin at roadside dhaba)
शंकरराव गडाख यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी दोन दिवस उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला.
उस्मानाबादमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम तसेच विविध कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी अहमदनगरकडे परतण्याचा निर्णय घेतला. घरी परतत असताना त्यांना वाटेत भूक लागली. त्यामुळे त्यांनी बंद असलेल्या एका धाब्यावर त्यांच्या जवळचा घरचा जेवणाचा डबा उघडला. त्या ठिकाणी असलेल्या एका खाटेवर बसून जेवण केले.
गडाख हे कॅबिनेट मंत्री जरी असले तरी त्यांनी त्यांच्यातील साधेपणा उपस्थितांना भावला. जेवताना त्यांनी उपस्थित लोकांशी काही विषयांवर चर्चा देखील केली.
आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर उस्मानाबाद (धाराशिव) येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. pic.twitter.com/dKneBuXm87
— Shankarrao Gadakh Patil (@GadakhShankarao) August 15, 2020
त्याशिवाय आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी उस्मानाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले. त्याशिवाय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उस्मानाबादेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
७४ वा भारतीय स्वातंत्र्यदिन, यानिमित्ताने उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री नात्याने शासकीय ध्वजारोहन केले.देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे थोर नेते, स्वातंत्र्य सेनानी, क्रांतीकारक, देशभक्त यांना अभिवादन केले. स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या pic.twitter.com/PWtr6QyRDY
— Shankarrao Gadakh Patil (@GadakhShankarao) August 15, 2020
यावेळी त्यांनी कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. कोरोना रुग्णांची संख्या, त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी आणि औषधोपचार याची पाहाणी केली. तसेच कोविड सेंटरमधील रूग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवाबाबत आढावा घेतला.
चार दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश
दरम्यान शंकरराव गडाख यांनी 11 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधत त्यांनी पक्षप्रवेश केला होता. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
“शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेल्या निष्ठा आणि विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे,” अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी शिवसेना प्रवेशानंतर दिली होती.
“यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव आणि गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील,” असेही ट्विट त्यांनी केले होते. (Minister Shankarrao Gadakh Eat Tiffin at roadside dhaba)
संबंधित बातम्या :
अनिल भैय्यांची पोकळी भरुन काढणार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंची शिवसेना आमदारांसोबत तब्बल 4 तास बैठक, रवींद्र वायकर यांची खास पदी नियुक्ती