शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात…

चंद्रपूरचे पालकमंत्री आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar on ShivThali) यांनी आज (29 फेब्रुवारी) शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.

शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात...
Follow us
| Updated on: Feb 29, 2020 | 5:50 PM

चंद्रपूर : चंद्रपूरचे पालकमंत्री आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar on ShivThali) यांनी आज (29 फेब्रुवारी) शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. चंद्रपूरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विजय वडेट्टीवार यांनी शिवभोजन थाळी केंद्राला भेट दिली. केंद्रातील जेवणाचा दर्जा आणि निटनेटकेपणा याबाबत वडेट्टीवारांनी समाधान व्यक्त केलं. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना हे केंद्र वरदान ठरणार असल्याचं मत विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या शिवभोजन थाळी (Vijay Wadettiwar on ShivThali) योजनेला मिळणारा प्रतिसाद अनुभवण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी शिवभोजनाचा आस्वाद घेतला. चंद्रपूरच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांनी दुपारच्या भोजनासाठी आपला ताफा थेट बसस्थानक चौकात असलेल्या शिवभोजन थाळी केंद्राकडे वळवला. या केंद्रात पोहोचल्यानंतर वडेट्टीवार यांनी स्वतः काऊंटवर जेवणाचे पैसे देत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील भोजनाचा आग्रह केला.

इथला भोजनाचा दर्जा आणि केंद्रातील निटनेटकेपणापाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना पोटभर जेवण मिळावे, ही सरकारची या योजनेमागची भूमिका आहे. ती सफल (Vijay Wadettiwar on ShivThali) होताना दिसत असल्याचे समाधान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली.

संबंधित बातम्या : 

पुण्यात शिवभोजन थाळीसाठी तुफान गर्दी, रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शस्त्रधारी पोलीस तैनात

‘शिवथाळी’साठी आधारसक्ती, फोटो जुळला तरच जेवण!

शिवभोजन थाळीची घोषणा शिवसेनेची, उपक्रम महाविकासआघाडीचा : छगन भुजबळ

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.