Abdul Sattar : …तेव्हा चांगल वाटलं, मग आता निर्णयाला स्थगिती मिळाल्याचं वाईट का वाटतं? सत्तारांचा महाविकास आघाडीवर निशाणा

महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी आधीच्या भाजप (bjp) सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली होती. तेव्हा चांगले वाटले, मग आता निर्णयाला स्थगिती मिळत असताना वाईट का वाटत आहे? असा सवाल अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलाय.

Abdul Sattar : ...तेव्हा चांगल वाटलं, मग आता निर्णयाला स्थगिती मिळाल्याचं वाईट का वाटतं? सत्तारांचा महाविकास आघाडीवर निशाणा
आ. अब्दुल सत्तार Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 12:51 PM

औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. तसेच त्यापूर्वी देखील महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी विकास कामांच्या जीआरचा (GR) सपाटा लावला होता. माता आता नवे सरकार सत्तेत येताच यातील अनेक निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी देण्यात आली होती. मात्र या निर्णयाला देखील नव्या सरकारने स्थगिती दिल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा जे निर्णय घेण्यात आले ते सरकार अल्पमतात असताना घाईघाने घेण्यात आले होते. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्याचे काम नवे सरकार करत असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हटलं सत्तार यांनी?

महाविकास आघाडीच्या काळात शेवटी जे निर्णय घेण्यात आले ते घाईघाईने घेण्यात आले होते. सरकार अल्पमतात असताना हे निर्णय घेतले गेले होते. निर्णय घेताना इतकी घाई केली की लगेच कपडे  धुवायला जाणार आहेत. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्याचे काम सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी आधीच्या भाजप सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली होती. तेव्हा चांगले वाटले, मग आता निर्णयाला स्थगिती मिळत असताना वाईट का वाटत आहे? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केलाय. आता 165 आमदारांचा पाठिंबा असलेले मजबूत सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्ण बहुमताने निर्णय घेतील असे सत्तार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

निधी वाटपाच्या निर्णयाला स्थगिती

पुढे बोलताना सत्तार यांनी म्हटले आहे की, निधी वाटपासंदर्भात मागच्या सरकारने जे निर्णय घेतले त्याला स्थगिती दिली जाणार आहे. त्या निर्णयामध्ये अनेक त्रुटी आहेत. काही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी तर वर्षभराचा निधी एकाच दिवसांत वाटप केला. हे चुकीचे आहे, त्यामुळे या निर्णयाला स्थिगीती देऊन ज्या विकास कामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे ती आधी केली जातील. त्यामुळे जे निर्णय स्थगित करण्यात येत आहेत, त्यावर कुणीही शंका घेण्याचे काम नसल्याचं यावेळी सत्तार यांनी म्हटले आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.