‘सत्तेसाठी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करु नये’ भातखळकरांचा राऊतांना टोला

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे. त्यावरुन आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना आव्हान दिलंय.

'सत्तेसाठी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करु नये' भातखळकरांचा राऊतांना टोला
संजय राऊत, अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 5:43 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न मागील काही काळापासून होत आहे. हे एकप्रकारे कारस्थान आहे, कपट आहे. ते उधळून लावलं पाहिजे. त्यासाठी माझं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आवाहन आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे. त्यावरुन आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना आव्हान दिलंय. (Atul Bhatkhalkar criticizes Sanjay Raut’s statement on Swatantyaveer Savarkar)

‘इतके पराकोटीचे कोडगे वक्तव्य करण्यासाठी कोणत्या प्रतीचा गांजा लागतो हे राउतच सांगू शकतात. सत्तेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये’, अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केलीय.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक होते. त्यांनी देशाला क्रांतीची दिशा दाखवली. त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्माण केले. ब्रिटीशांच्या मनात दहशत निर्माण केली. मदनलाल धिंग्रासारखे लोक निर्माण केले. ते क्रांतिकारकांचे शिरोमणी होते. त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न मागील काही काळापासून होत आहे. हे एकप्रकारे कारस्थान आहे, कपट आहे. ते उधळून लावलं पाहिजे. त्यासाठी माझं पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना आवाहन आहे. सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा, असं आवाहन राऊत यांनी केलंय.

‘गलिच्छपणे टीका करण्यांवर कारवाई करा’

सेनापतीचं राजकारण गेल्या काही वर्षांपासून सुरु झालं आहे. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधींचं जेवढं स्थान आहे. तेवढंच पटेल, सावरकर, भगतसिंग आणि टिळकांचं आहे. त्या सर्वांनी देशासाठी समान त्याग केल्याचंही राऊत म्हणाले. टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण गलिच्छपणे टीका करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही राऊत यांनी यावेळी केलीय.

‘रोखठोक’मधील राऊतांची भूमिका काय?

तत्पूर्वी दैनिक सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरामधूनही शिवसेनेने सावरकरांविषयी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. या लेखात नायकावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं गेलं आहे. “पारतंत्र्यात सावरकर हे सगळय़ांचे नायक होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू झाला तो आजही सुरूच आहे. आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही सावरकर या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. सावरकरांविषयी द्वेष आणि विष पसरवूनही ते लोकांच्या मनावर अढळपणे विराजमान आहेत.”

इतर बातम्या :

‘खासदाराला साधा अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं’, गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला

‘गेले त्यावर चर्चा नको, पुन्हा नव्याने बुरुज उभा करण्याकडे लक्ष द्या’, जयंत पाटलांचं कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवाहन

Atul Bhatkhalkar criticizes Sanjay Raut’s statement on Swatantyaveer Savarkar

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.