AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election: बच्चू कडू, काँग्रेसच्याच आमदाराची बैठकीला दांडी! अबु आजमी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; सपा पाठिंबा देणार?

Rajya Sabha Election: तब्बल 15 अपक्ष आमदार उपस्थित होते. त्यामुळे आघाडीच्या जिवात जीव आला आहे. इतरही अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष आपल्यासोबत येतील असा दावा आघाडीचे नेते करत आहेत.

Rajya Sabha Election: बच्चू कडू, काँग्रेसच्याच आमदाराची बैठकीला दांडी! अबु आजमी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; सपा पाठिंबा देणार?
बच्चू कडू आणि काँग्रेसच्याच आमदाराची दांडी, अबु आजमी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; सपा पाठिंबा देणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 6:08 AM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) मोर्चेबांधणीसाठी महाविकास आघाडीने (mahavikas aghadi) कंबर कसली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीची ट्रायडंटमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं. त्यांना एकीचं बळ दाखवण्याचं आवाहन करण्यात आलं. या बैठकीला एकूण 15 अपक्ष आमदार उपस्थित होते. तर काँग्रेसच्याच एका आमदाराने दांडी मारली. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे सुद्धा आजच्या बैठकीला नव्हते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे समाजवादी पार्टीचे नेते अबु असीम आजमी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची भेट घेणार आहेत. आधी आजमी यांनी तात्त्विक मुद्द्यावरून आघाडीची कोंडी केली होती. मंगळवारी दुपारी सपाच्या आमदाराने परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली होती. त्यानंतरही आघाडीसोबत न जाण्यावर समाजवादी पार्टी ठाम होती. मात्र, अचानक चक्रे फिरल्यानंतर आता आजमी मुख्यमंत्र्यांना भेटणार असून आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

गीता जैन, देवेंद्र भुयार, मंजुळा गावित, आशिष जयस्वाल, किशोर जोरगेवार, नरेंद्र भोंडकर, श्यामसुंदर शिंदे, संजय मामा शिंदे, चंद्रकांत पाटील (जळगाव), विनोद निकोले, विनोद अग्रवाल आणि राजकुमार पटेल या अपक्ष आमदारांनी आजच्या बैठकीला हजेरी लावून आम्ही आघाडीसोबत असल्याचं दाखवून दिलं आहे. तब्बल 15 अपक्ष आमदार उपस्थित होते. त्यामुळे आघाडीच्या जिवात जीव आला आहे. इतरही अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष आपल्यासोबत येतील असा दावा आघाडीचे नेते करत आहेत.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस आमदार पोहोचलेच नाहीत

काँग्रेसने सोमवारी सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काँग्रेसचे आमदार मुंबईत आले. परंतु, काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे बैठकीला पोहोचू शकले नाहीत. कुटुंबात लग्न सोहळा असल्याने ते बैठकीला पोहोचले नाही. त्यांनी पक्षश्रेष्ठींना तसं कळवलंही आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ते मुंबईत येणार आहेत. मात्र, ते काँग्रेससोबतच असून आघाडीच्याच उमेदवाराला मतदान करणार आहेत.

बच्चू कडूंची दांडी

प्रहार संघटनेचे नेते आणि मंत्री बच्चू कडू हे सुद्धा मंगळवारच्या बैठकीला दिसले नाहीत. बच्चू कडू यांनी मतदानाच्या पाच मिनिटाच्या आधी मतदानाबाबतचा फैसला करू, असा इशारा दिला होता. त्यातच ते मंगळवारी बैठकीला न आल्याने त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आजमी राजी?

दरम्यान, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी अनिल परब यांची मंगळवारी दुपारी भेट घेतली होती. यावेळी त्यांनी परब यांना मागण्यांचं निवेदन दिलं होतं. आजच्या बैठकीला अबु आजमी आणि शेख आले नाहीत. मात्र संध्याकाळी अबु आजमी यांनी मीडियाशी संवाद साधला. आज मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सपाचा आघाडीला पाठिंबा मिळेल असं सांगितलं जात आहे.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.