‘अजितदादा काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही’, बैलगाडा शर्यतीबाबत गोपीचंद पडळकरांचा टोला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते. आता पडळकर यांनीही अजित पवारांना उत्तर दिलं आहे. बैलगाडा शर्यत सुरु करण्याविषयी अजितदाद काय बोलतात त्याला काडीची किंमत नाही. अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत. महाविकास आघाडी सरकार मोगलांच्या वृत्तीचं सरकार असल्याचा आरोपही पडळकर यांनी केलाय.
कराड : बैलगाडा शर्यतीवरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सांगली पोलिसांना गुंगारा देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी गनिमीकाव्यानं झरे गावात बैलगाडा शर्यत घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते. आता पडळकर यांनीही अजित पवारांना उत्तर दिलं आहे. बैलगाडा शर्यत सुरु करण्याविषयी अजितदाद काय बोलतात त्याला काडीची किंमत नाही. अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत. महाविकास आघाडी सरकार मोगलांच्या वृत्तीचं सरकार असल्याचा आरोपही पडळकर यांनी केलाय. (Gopichand Padalkar criticizes Ajit Pawar over bullock cart race)
कराडमधील बैलगाडा मालक धनाजी शिंदे यांच्या घरी गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली. अजितदादा काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही. त्यांनी अनेकदा वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहे. हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यांची भाषणं काढून पाहा. बैलगाडा शर्यत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही, अशी त्यांची भाषणं आहेत, असा टोला पडळकरांनी लगावला आहे. झरे गावातील आंदोलन सरकारला मोडून काढायलं होतं. दोन वर्षात कोर्टाकडे का गेला नाहीत. मराठा आरक्षणाचा वकील त्यांनीच नेमला होता. सरकार आमच्याकडे कागदपत्र देत नाही. म्हणून आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य मत मांडू शकलो नाहीत. आजचं सरकार मोगलांच्या वृत्तीचं असल्याचा आरोपही पडळकर यांनी केलाय.
अजित पवार काय म्हणाले होते?
“बैलगाडा शर्यत केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेला प्रश्न आहे. संसदेत अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. सध्या काहीजण स्टंटबाजी करत आहेत. जे स्टंट करतात त्यांचंच मागच्या पाच वर्षात सरकार होतं. त्यांना कोणीही अडवलं नव्हतं. आताही केंद्रात त्यांचंच सरकार आहे. सध्या केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरु आहे. आम्ही लोकांचं भलं करतोय असं दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे”, अशा शब्दात अजितदादांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता निशाणा साधला.
पडळकरांवर कारवाई नक्की, अजितदादांचे संकेत
सांगलीत बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी पडळकरांवर गुन्हा दाखल होणार का?, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “वास्तविक कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असेल आणि त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असेल तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होईल. गुन्हे दाखल केले जातील”, असं म्हणत पडळकरांवर कारवाईचे संकेत अजितदादांनी दिले.
इतर बातम्या :
शिळ्या कढीला ऊत आणू नका, आमच्यासाठी तो विषय संपला, राज ठाकरेंच्या प्रकरणाचा अजित पवारांकडून THE END
Gopichand Padalkar criticizes Ajit Pawar over bullock cart race