ईडी चौकशीमुळे आता मी देखील मोठा झालोय : आमदार हितेंद्र ठाकूर

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराच्या मालकीच्या विवा ग्रुप या कंपनीची आज सकाळपासून ईडीकडून झाडाझडती सुरू आहे.

ईडी चौकशीमुळे आता मी देखील मोठा झालोय : आमदार हितेंद्र ठाकूर
Hitendra Thakur
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 3:37 PM

विरार : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराच्या मालकीच्या विवा ग्रुप या कंपनीची आज सकाळपासून ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. हितेंद्र ठाकूर यांचे जुने घर आणि त्यांच्या कार्यालयावर ही चौकशी सुरू असल्याची माहिती स्वतः हितेंद्र ठाकूर यांनी दिलीय. त्यामुळे वसई-विरारच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय (MLA Hitendra Thakur comment on ED investigation of his company Viva Group).

ईडीच्या चौकशीवर आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले, “ईडीची जी काही चौकशी असेल त्याला आम्ही सामोरं जाण्यास तयार आहोत. त्यांची चौकशी सुरू आहे. ईडीच्या तपासात जे काही निष्पन्न होईल त्याबाबत आम्ही आमचा व्यवहार दाखवायला तयार आहोत. कारण सर्व व्यवहार धनादेशाने झाले आहेत.”

माझ्या कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने आता मीही मोठा झालो आहे, असा उपरोधात्मक टोलाही हितेंद्र ठाकूर यांनी लगावला.

“ईडी काय चौकशी करत आहे माहिती नाही. ते जी काही चौकशी करायची ते करतील. त्यांना जी तपासणी करायची आहे ते तपासतील. ईडी आमच्या स्टेशनवरील घरी आणि ऑफिसला चौकशी करत आहे. आमचं नाव कशातही येऊ द्या, जे काही चेकचे व्यवहार आहेत त्याचं स्पष्टीकरण आम्ही ईडीला देऊ. ईडीचा ससेमिरा माझ्यामागे लागावा इतका मोठा नेता मी नाही. पण या चौकशीमुळे आज वृत्तवाहिन्यांवर मी दिसतोय, उद्या वर्तमानपत्रालाही नाव येईल. त्यामुळे मला मोठं होण्याची संधी मिळालीय,” असंही ठाकूर म्हणाले.

‘आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर दोघेही विवा ग्रुपचा भाग नाही’

विवा ग्रुपमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर हे दोघेही नाहीत. त्यांचे चुलत भाऊ दीपक ठाकूर आणि आणि इतर परिवार  विवा ग्रुपचं काम पाहतात.

हेही वाचा :

मी लाईट बिल भरणार नाही, तुम्हीही भरु नका, आमदार हितेंद्र ठाकूर संतापले

बहुजन विकास आघाडीला धक्का, क्षितिज ठाकूरांच्या खंद्या समर्थकाचा अलविदा, नवा पक्ष ठरला?

हितेंद्र ठाकूरांचा मोठा निर्णय, अख्ख्या वसई-विरारला घरपोच अन्न पुरवणार, साडे तीन लाख कुटुंबांना मोफत शिधा

व्हिडीओ पाहा :

MLA Hitendra Thakur comment on ED investigation of his company Viva Group

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.