कोरोना काळात कौतुकास्पद काम करणाऱ्या आ. निलेश लंकेंची सातासमुद्रापार दखल, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मान

कोविड सेंटर उभा करुन निलेश लंके थांबले नाहीत तर कोरोना रुग्णांवरील औषधोपचार, त्यांचा आहार आदी गोष्टींकडेही त्यांनी एखाद्या डॉक्टरप्रमाणे लक्ष दिलं. तसंच कोविड सेंटरमध्ये अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम, योग शिबिरं आयोजित करुन लंके यांनी रुग्णांच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली.

कोरोना काळात कौतुकास्पद काम करणाऱ्या आ. निलेश लंकेंची सातासमुद्रापार दखल, 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन'ने सन्मान
आमदार निलेश लंके यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने सन्मान
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 6:13 PM

अहमदनगर : राज्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या कमी पडत असताना अनेक नेते, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत कोविड सेंटरची उभारणी केली. अशाच एका कोविड सेंटरची चर्चा राज्यासह अवघ्या देशभरात होत आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भावळणी इथं तब्बल 1 हजार 100 बेडचं कोविड सेंटर सुरु केलं. फक्त कोविड सेंटर उभा करुन निलेश लंके थांबले नाहीत तर कोरोना रुग्णांवरील औषधोपचार, त्यांचा आहार आदी गोष्टींकडेही त्यांनी एखाद्या डॉक्टरप्रमाणे लक्ष दिलं. तसंच कोविड सेंटरमध्ये अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम, योग शिबिरं आयोजित करुन लंके यांनी रुग्णांच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली. त्यांच्या याच कामाचं कौतुक आता ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’कडून करण्यात आलं आहे. (MLA Nilesh Lanke honored with World Book of Records London Award)

आमदार निलेश लंके यांच्या कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेत ”वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन” या राष्ट्रीय पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोना काळात आदर्श काम केल्यामुळे निलेश लंकेंचा डंका सातासमुद्रापार पोहोचला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा आज मुंबई इथं पार पडला. लंके यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 हजार १०० बेडच कोविड सेंटर उभारलं होतं. या सेंटरची चर्चा देशभरात झाली होती. तर कोविड सेंटरमध्ये जवळपास 7 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

निलेश लंके यांच्या सेवेची विदेशातही दखल

लंके यांच्या कार्याची दखल घेत देशभरातून अनेक दानशूर व्यक्तींनी कोविड सेंटरला आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत केली. कोरोनाच्या संकटात गेल्या दीड वर्षापासून कोरोना बाधितांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्या या सेवेची विदेशातही दखल घेतली आहे. महत्वाची बाब म्हणजे अशाप्रकारे सन्मान होणारे लंके हे महाराष्ट्रातील ते‌ एकमेव आमदार ठरले आहेत.

लंके यांच्याकडून पुरस्कार कार्यकर्ते आणि जनतेला समर्पीत

कोरोना रूग्णांसाठी केलेल्या कामगिरीबददल मिळालेला लंडन येथील वर्ल्ड बुक रेकॉर्ड पुरस्कार आपण मतदारसंघातील विधवा, परित्यक्त्या, अपंग, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आरोग्य मंदीरात काम करणारे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, नीलेश लंके प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते तसेच मतदारसंघातील जनतेला समर्पीत करीत असल्याची प्रतिक्रिया आमदार नीलेश लंके यांनी गुरूवारी मुुंबईत पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली.

सर्वत्र लंके यांचे भरीव काम दिसून येतं – फराह अहमद

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा श्रीमती फराह अहमद यांनी गुरूवारी दुपारी आ. लंके यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी बोलताना फराह अहमद म्हणाल्या कोरोना संकटात लंके यांंनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याची संपूर्ण जगाने दखल घेतली. कोणत्याही माध्यमांवर नजर फिरविली की सर्वत्र लंके यांचे भरीव काम दिसून येते. त्यांच्या या कार्याची आमच्या संस्थेने दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या नावांमध्ये लंके यांचेच नाव सर्व बाबतीत आघाडीवर राहिले. त्यामुळे पुरस्कार्थीची निवड करण्यास काहीही अडचणी आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवारांकडूनही कौतुक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आ. लंके यांनी भेट घेतल्यानंतर कोरोना काळात मिळालेल्या पुरस्काराबददल आनंद व्यक्त केला. लंके यांनी कोरोना रूग्णांची सेवा करताना दिशादर्शक काम केले. त्याची लंडनच्या संस्थेने दखल घेउन सन्मान केल्याबददल पवार यांनी लंके यांचे कौतुक केलं.

संबंधित बातम्या :

रुग्णांना मदत करण्यात अपयश आलं, तर रात्र रात्र झोप येत नाही : आमदार निलेश लंके

“माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं”

MLA Nilesh Lanke honored with World Book of Records London Award

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.