Sharad Pawar | एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं – निलेश राणे
"स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला", असं ट्विट निलेश राणे यांनी केलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर (Nilesh Rane Criticize Sharad Pawar) नातू आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली. यावेळी “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही”, असं शरद पवार म्हणाले होते. त्यावरुन आता माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे (Nilesh Rane Criticize Sharad Pawar).
“स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं. तसेच, “एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले”, असंही ते म्हणाले.
शिवाय, “पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थ ने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली म्हणून?”, असा प्रश्नही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.
स्वतःच्या नात्वाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थ ने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली म्हणून?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 12, 2020
Nilesh Rane Criticize Sharad Pawar
हेही वाचा : पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार
शरद पवार काय म्हणाले?
पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”.
पार्थ पवार काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ यांनी केली होती.
“सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची हीच भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी” सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या आपल्या ट्वीटमध्ये पार्थ पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं होतं.
याआधी, पार्थ पवार तरुण आहेत, नवीन आहेत, त्यांना अनुभव कमी आहे, त्यामुळे अशा गोष्टी घडतात. पण त्यामुळे काही मतभेद होणार नसल्याची प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली होती.
पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला छेद देणाऱ्या भूमिका दोन वेळा घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
शरद पवार म्हणाले, तो इमॅच्युर, आता पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया…..https://t.co/yGqAZntL5o #SharadPawar #ParthPawar
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 12, 2020
Nilesh Rane Criticize Sharad Pawar
संबंधित बातम्या :
पार्थ पवार यांचे ‘जय श्री राम!’, अयोध्येतील राम मंदिर निर्माणाला पत्रातून शुभेच्छा
पार्थ पवार तरुण, अनुभव कमी; ‘जय श्री राम’च्या भूमिकेवर नवाब मलिक यांची सारवासारव