राणे कुटुंबाबाबत लूकआऊट सर्क्युलर, आता नितेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर, ठाकरे सरकारला इशारा
आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्ज खातं मुंबईतील बँकेत आहे, मग पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस का बजावली? पाच महिने आधी लोन सेटलमेंटसाठी बँकेला पत्र देऊनही आता ही नोटीस का बजावण्यात आली? असे प्रश्न नितेश राणेंनी विचारले आहेत.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याबद्दल पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून लूकआऊट सर्क्युलर काढण्यात आलं आहे. एअरपोर्ट अथॉरिटीला हे सर्क्युलर बजावण्यात आलं आहे. त्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्ज खातं मुंबईतील बँकेत आहे, मग पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस का बजावली? पाच महिने आधी लोन सेटलमेंटसाठी बँकेला पत्र देऊनही आता ही नोटीस का बजावण्यात आली? असे प्रश्न नितेश राणेंनी विचारले आहेत. (Nitesh Rane warns Thackeray government after lookout circular was issued)
नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर आरोप
पाच महिने अगोदर आम्ही संबंधित बँकेला पत्र दिलं होतं की आम्हाला हे कर्ज सेटलमेंट करायचं आहे. बँकेकडे ते पत्र आहे. मग आता अशा पद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा हा की आमचं हे लोन अकाऊंट मुंबईच्या बँकेत आहे. मग, पुणे पोलिसांनी हे सर्क्युलर का काढलं? जर एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला लोन सेटलमेंट करायचं असेल तर अशापद्धतीची नोटीस काढण्यात काही अर्थच नाही. हा पूर्ण राजकारणाचा भाग आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय.
हे लूकआऊट सर्क्युलर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला देण्यात आलं आहे. सगळ्या एअरपोर्ट्सना. आम्ही या सर्क्युलरविरोधात हायकोर्टात दाद मागणार आहोत. याला काही अर्थ नाही. कारण जे लोन आम्हाला 5 महिन्यांपूर्वी भरायचं होतं त्याची आता नोटीस काढून काही अर्थ नाही ना. ठाकरे सरकार आम्हाला घाबरलं आहे, अशा पद्धतीने पत्र आणि नोटीस काढत बसले आहेत.
— nitesh rane (@NiteshNRane) September 9, 2021
नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे?
लूकआऊट नोटीस काढायचीच असेल तर मी यांना मुद्दे देतो. नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा व्यक्ती गेल्या चार महिन्यांपासून गायब आहे. त्याचे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध आहेत. मग आता लूकआऊट नोटीस काढायची असेल तर आदित्य ठाकरेंबाबत काढायला हवी, की नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे? माझ्याकडे कागदपत्र आहेत. 2019 पर्यंत आदित्य ठाकरे आणि ते एका कंपनीत पार्टनर होते. अशा व्यक्तीबद्दल तुम्ही लूकआऊट नोटीस काढा, असं थेट आव्हानच नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला दिलंय.
Nandkishor Chaturvedi who is apparently missing for months now or rather absconding.. has been a partner with Min Aditya T .. Shudnt Pune crime branch where this person is ? A LOC shud be issued here too so Aditya T doesn’t fly out of the country.. What’s the mystery?? pic.twitter.com/MeAPkNJNYI
— nitesh rane (@NiteshNRane) September 9, 2021
गणपतीमध्ये नाचत बसा आता, नितेश राणेंचा इशारा
अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यांची अनेक प्रकरणं आमच्याकडे आहेत. आता हात घातला आहे ना, मग गणपतीमध्ये नाचत बसा आता. त्यांना वाटतं की असल्या गोष्टी केल्यावर हे घाबरतील. पण त्यांनी एक प्रकरण काढलं तर आम्ही त्यांची दोन प्रकरणं काढू. आता सांगा नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहे? गेल्या चार महिन्यांपासून तो कुठे गायब आहे? हे त्यांनी सांगावं आता महाराष्ट्राला. नाहीतर उत्तर देण्यासाठी मी काही दिवसांत पत्रकार परिषद घेतो, असा इशाराच नितेश राणे यांनी ठाकरेंना दिलाय.
नेमकं प्रकरण काय?
नितेश राणे आणि त्यांच्या आईच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून 40 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. राणे कुटुंबियांनी आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कर्ज घेतलं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत
काय आहे लूकआऊट सर्क्युलर?
लूकआऊट सर्क्युलर हे साधारणपणे नजर ठेवण्यासाठी बजावण्यात येतं. राणे कुटुंबाला बजावण्यात आलेल्या लूकआऊट सर्क्युलरमध्ये असं सांगण्यात आलं आहे. यांची अरायव्हल आणि डिपार्चरची माहिती पुणे पोलिसांना देण्यात यावी. म्हणजे तुम्ही यांच्यावर नजर ठेवून राहा अशी सूचनाच एकप्रकारे लूकआऊट सेलला देण्यात येते. याचा अर्थ असा की नितेश राणे आणि नीलम राणे कुठे जात आहेत? कुठून आले? याची सर्व माहिती पुणे पोलिसांना द्यावी लागेल. थोडक्यात हे लोक कुठेही प्रवास करत असतील तर त्याची माहिती विमानतळाकडून देण्यात येणं गरजेचं असतं.
इतर बातम्या :
केंद्रातील जुलमी, अत्याचारी भाजपा सरकारविरोधात पेटून उठा, नाना पटोलेंचं साताऱ्यातून जनतेला आवाहन
Nitesh Rane warns Thackeray government after lookout circular was issued