डोकं ठिकाणावर आहे का? पदवीधर मतदारसंघ कुणाच्या बापाचा नाही, प्रशांत बंबांवर आमदार अभिजीत भडकले

अभिजीत वंजारी म्हणाले, ' त्यांचा बंब लीक झाला आहे .आता शिक्षकांनी 2024 निवडणुकीत याना धडा शिकविला पाहिजे. त्यांचा समाचार घेतला पाहिजे. अशा लोकांना काढून फेकतील..

डोकं ठिकाणावर आहे का? पदवीधर मतदारसंघ कुणाच्या बापाचा नाही, प्रशांत बंबांवर आमदार अभिजीत भडकले
पदवीधर मतदार संघ रद्द करण्याची आमदार प्रशांत बंब यांची मागणी Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 4:20 PM

औरंगाबाद-नागपूरः जिल्हा परिषद शाळांमधील (ZP teacher) शिक्षकांवर आरोप करणाऱ्या आमदार प्रशांत बंबांनी (Prashant Bamb) आता टोकाचीच मागणी केलीय. राज्य सरकारने पदवीधर शिक्षक मतदार संघातून आमदार निवडून देणंच बंद करावं. जे शिक्षक मतदान करतात, त्यापैकी 80 टक्के लोक खोटे वागतात. फौजदारी कामं करतात. अशा शिक्षकांना सपोर्ट करणारे हे पदवीधरचे आमदार (Maharashtra MLA) असतात असा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय. बंब यांच्या या वक्तव्यावरून नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी खूपच भडकलेत. याचं डोकं फिरलंय की काय? याने म्हटलं की मतदार संघ रद्द होईल का? हा काय याच्या बापाचा मतदारसंघ आहे का, असा सवाल अभिजीत वंजारी यांनी केलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिक्षक आणि आमदार प्रशांत बंब यांच्यात सुरु असलेल्या वादात आता आमदारांचीही एंट्री झाली आहे.

प्रशांत बंब काय म्हणाले?

पदवीधर मतदार संघाबाबत बोलताना आमदार प्रशांत बंब म्हणाले, ‘ 100 टक्के आमदार शिकलेले असतात. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातले आमदार, जे शिक्षक खोटे वागतात, खोटे कागदपत्र तयार करतात, फौजदारी स्वरुपाची कामं करतात, अशा शिक्षकांना सपोर्ट करणाऱ्या गोष्टी आमदार करायला लागलेत. या आमदारांच्या पोस्टची आता गरज नाही… जिल्हा परिषदेच्या शिक्षकांविरोधात वारंवार आरोप करणाऱ्या प्रशांत बंब यांनी घेतलेल्या या नव्या भूमिकेमुळे नव्याच वादाला तोंड फुटलंय.

अभिजीत वंजारींचं प्रत्युत्तर

प्रशांत बंब यांच्या भूमिकेवरून नागपूर पदवीधरचे आमदार अभिजीत वंजारींचं सडकून टीका केलीय. ते म्हणाले, ‘ कुणाच्या बापाचा मतदार संघ थोडी आहे… हा काय सात बारा थोडी आहे? कधी कोरा केला, कधीही बोजा चढवला… विधान परिषदेची निर्मिती इंग्रजांच्या काळापासून झालेली आहे. मुंबई प्रोव्हिएन्समध्ये या मतदार संघाची निर्मिती झाली होती…

हे सुद्धा वाचा

2024 मध्ये यांनाच उचलून फेकतील…

शिक्षकांवर आरोप करणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांनाच 2024 मध्ये जनता धडा शिकवेल असं वक्तव्य वंजारी यांनी केलं. ते म्हणाले, ‘ शिक्षकांबद्दल त्यांचं वक्तव्य योग्य नाही. शिक्षकांना किती काम करावं लागतं, हे मुळात त्यांना माहीत नाही. शिक्षकांना शासकीय यंत्रणेची काम दिली जातात ते जीवाची पर्वा न करता काम करतात.

यांचा बंब लीक झालाय..

अभिजीत वंजारी पुढे म्हणाले, ‘ त्यांचा बंब लीक झाला आहे .आता शिक्षकांनी 2024 निवडणुकीत याना धडा शिकविला पाहिजे. त्यांचा समाचार घेतला पाहिजे. अशा लोकांना काढून फेकतील.. असं नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी वक्तव्य केलं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.