ठाणे : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पदाधिकारी नियुक्तीवरुन दोन बडे नेते आमनेसामने आल्याचं चित्र आज पहायला मिळालं. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि मीरा भाईंदर शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक यांच्यातील पत्र व्यवहार समोर आला होता. शिवसेना नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यांच्या हस्ते काहींना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. मात्र, संपर्कप्रमुख या नात्यानं सरनाईक यांनी या नियुक्त्या रद्द ठरवल्या होत्या. त्यानंतर सरनाईक आणि शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर मात्र सरनाईक यांनी एक पत्रक काढत नेमकं प्रकरण काय हे सांगितलं आहे. (MLA Pratap Saranaik and Eknath Shinde face off over appointment of Shivsena office bearers)
प्रताप सरनाईक यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. सरनाईक हे मीरा भाईंदरचे संपर्कप्रमुख आहेत. त्यामुळे मीरा भाईंदर शिवसेनेत वर्चस्व ठेवण्याचा सरनाईक यांचा प्रयत्न आहे. सरनाईक यांच्यामागे सध्या ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अशावेळी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि जिल्हा संघटक स्नेहल सावंत यांनी पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते अनेकांना नियुक्ती पत्र देण्यात आली होती. त्यावर प्रताप सरनाईक यांनी एक पत्र लिहून नियुक्त्या रद्द करण्यास सांगितलं. शिवसेनेचे वृत्तपत्र असलेल्या सामना तसेच वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याबाबत, असा या पत्राचा आशय होता.
शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझी मिरा-भाईंदर मध्ये सुरु असलेल्या अनधिकृत नियुक्त्या याबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या वेळी संपर्कप्रमुखांना विश्वासात न घेता कोणत्याही नियुक्त्या करता येणार नाहीत, यावर एकमत झालं. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे इथे जाऊन काही नव्याने नेमलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या हाती पत्र देऊन फोटो काढले. परंतु एकनाथ शिंदे याबाबतीत अनभिद्न्य होते. त्यांना या सर्व नियुक्त्यांच्या संदर्भात कुठलीच कल्पना नसल्याचे समजले, असा खुलासा प्रताप सरनाईक यांनी केलाय.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते व पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझी मिरा भाईंदर मध्ये सुरु असलेल्या अनधिकृत नियुक्त्या या बाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या वेळी संपर्कप्रमुखांना विश्वासात नं घेता कोणत्याही नियुक्त्या करता येणार नाहीत यावर एकमत झाले. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबान कडे ठाणे येथे जाऊन काही नव्याने नेमलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या हाती पत्र देऊन फोटो काढले. परंतु माननीय शिंदे साहेब याबाबतीत अनभिद्न्य होते. त्यांना या सर्व नियुक्त्यांच्या संदर्भात कुठलीच कल्पना नसल्याचे समजले.
महाराष्ट्रात सर्वत्र शिवसेनेच्या नियुक्त्या या स्थानिक संपर्कप्रमुखांना विश्वासात घेतल्याशिवाय करण्यात येतं नाहीत, हि शिवसेनेची शिस्त आहे. त्यामुळे मिरा भाईंदर शहरासाठी हि शिस्त मोडण्याची मुभा कोणालाही दिलेली नाही. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला शिस्त लाऊन दिली आहे. त्या शिस्तीचा भंग कोणीही केलेला संपर्कप्रमुख म्हणून मी खपवून घेणार नाही. त्यामुळे दिनांक १७ सप्टेंबर रोजी मी जिल्हाप्रमुख व महिला जिल्हासंघटक यांना दिलेल्या पत्रात जे नमूद करण्यात आले आहे, त्या सूचना अंतिम आहेत.
नेत्यानं मध्ये भांडणे लावण्याचे उपद्व्याप काही स्थानिक पदाधिकारी करत आहेत, मिडिया ला चुकीच्या बातम्या पुरवत आहेत व सोशल मिडिया च्या माध्यमातून अयोग्य संदेश पसरवत आहेत. त्यांनी ते त्वरित थांबवावेत अन्यथा त्यांच्यावर कारवाही करण्यात येईल.
मिरा भाईंदर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न मला तुमच्या सर्वांच्या साथीने एकजुटीने पूर्ण करायचे आहे. मुख्यमंत्री सन्माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे व पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनचे हात बळकट करायचे आहेत. यासाठी सर्वांनी एकजूट होऊन पक्षाचे कामं अधिक मजबुतीने करूया. मला खात्री आहे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्नं साकार करण्यासाठी प्रत्येक कडवट शिवसैनिक मला साथ देईल.
इतर बातम्या :
‘लखोबा लोखंडे’चं लिखाण हे फडणवीसांचं मत होतं का?, रुपाली चाकणकरांचा सवाल
चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी, पालकमंत्री उदय सामंतांची माहिती
MLA Pratap Saranaik and Eknath Shinde face off over appointment of Shivsena office bearers