पडळकर म्हणाले, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, आता रोहित पवारांचं जशास तसं उत्तर

एखाद्या मोठ्या नेत्यावर कुणी असं वक्तव्य करत असेल तर एखाद्या युवकाला ते चुकीचं वाटलं असेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी पडळकरांच्या गाडीवरील दगडफेकीबाबत दिलीय.

पडळकर म्हणाले, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, आता रोहित पवारांचं जशास तसं उत्तर
आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रोहित पवार
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 4:56 PM

अहमदनगर : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पडळकर यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणत्याही महिलेला विचाराल तर सांगतील की चुकीची गोष्ट आहे. एखाद्या मोठ्या नेत्यावर कुणी असं वक्तव्य करत असेल तर एखाद्या युवकाला ते चुकीचं वाटलं असेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी पडळकरांच्या गाडीवरील दगडफेकीबाबत दिलीय. (Rohit Pawar responds to Gopichand Padalkar’s criticism of Sharad Pawar)

सोलापुरात त्या युवकाने जे केलं ते चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही. मात्र, त्यामागील विचारही समजून घेणं महत्वाचं आहे. जे भाजप नेते पडळकरांना प्रोत्साहन देत आहेत, त्यांनी सांगावं की जे वक्तव्य पडळकरांनी केलं ते योग्य आहे का? महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभतं का? असा सवालही रोहित पवार यांनी केलाय. पडळकर यांना जी आमदारकी दिली गेलीय ती फक्त पवारांवर टीका करण्यासाठी देण्यात आलीय. पडळकर अशी टीका करतात की त्याचं उत्तरही देता येत नाही. कारण त्यांच्या टीकेचं उत्तर दिलं तर आपली लेव्हल काय राहिल, असा खोचक टोलाही रोहित पवारांनी लगावलाय. दोन दगडं एकमेकांवर आदळली तर आगच पेटेल, त्यापेक्षा न बोललेलं बरं, असंही रोहित पवार म्हणाले.

पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी खिल्ली उडवली. कोंबड्याला वाटतं मी आरवल्याशिवाय  दिवस उजाडत नाही, असे कोंबडे दिल्लीत एकत्रित आले होते, असा घणाघात पडळकरांनी पवारांच्या दिल्ली बैठकीवरुन केला.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काल सोलापुरात दगडफेक झाली होती. त्यानंतर पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अंगुलीनिर्देश केलाय. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेकून पळ काढणाऱ्याचा फोटो समोर आलाय. दगडफेक करणारा तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

पडळकरांची पवारांवर टीका, लंकेंनी समाचार घेतला, म्हणाले, ‘गोपीचंद 100 टक्के चुकले पण…’

‘प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला’, दगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, रोहित पवारांचा फोटो ट्विट!

Rohit Pawar responds to Gopichand Padalkar’s criticism of Sharad Pawar

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.