…म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
बच्चू कडू आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रवी राणा फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.
नागपूर : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राजकारण चांगलचं तापलं होतं. आरोपानंतर बच्चू कडू अधिक आक्रमक झाले. रवी राणा यांनी पुरावे द्यावे अन्यथा वेगळा निर्णय घेऊ, आपल्याला सात ते आठ आमदारांचा पाठिंबा आहे असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटलं असं वाटत असतानाच पुन्हा एकदा रवी राणा यांच्या एका व्यक्तव्यामुळे वाद वाढण्याची चिन्हं आहेत. मात्र रवी राणा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी सौम्य भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. बच्चू कडू आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. ते भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.
आभार व्यक्त करण्यासाठी भेट
दरम्यान रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे बच्चू कडू नाराज असून, राणांच्या वक्तव्यानंतर कडू फडणवीसांकडे नाराजी व्यक्त करणार आहेत. त्यासाठी ते फडणवीस यांची भेट घेणार आहेत अशी चर्चा होती. मात्र बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया देताना सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. राणांचं वक्तव्य साधारण आहे, माला वाद वाढवायचा नाही. मतदारसंघाला निधी दिल्यानं आभार माणण्यासाठी फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हलट आहे.
रवी राणाही फडणवीसांची भेट घेणार
दरम्यान दुसरीकडे रवी राणा देखील आज फडणवीस यांची भेट घेणार आहेत. रवी राणा फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.