MLC Election| केंद्रीय तपास यंत्रणांकडून आघाडीच्या आमदारांना फोन, योग्य वेळी फोन कॉल उघड करू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य

20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार असून यावेळी भाजपसाठी मतदान करण्याकरिता महाविकास आघाडीच्या आमदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

MLC Election| केंद्रीय तपास यंत्रणांकडून आघाडीच्या आमदारांना फोन, योग्य वेळी फोन कॉल उघड करू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 1:44 PM

मुंबईः विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांवर भाजपतर्फे दबाव आणला जात आहे. एवढंच नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत आमदारांना फोन येत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. तसेच योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही हे सर्व फोन कॉलचे डिटेल्स उघड करू, पण महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) एकही आमदार या दबावाला बळी पडणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. सोमवारी 20 जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान आहे. या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून आपापल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यात येत आहे. मात्र भाजपतर्फे आमदारांवर दबाव येत असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं.

काय म्हणाले नाना पटोले?

20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार असून यावेळी भाजपसाठी मतदान करण्याकरिता महाविकास आघाडीच्या आमदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. पण केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाहीत. आमचे सहाही उमेदवार निवडून येतील. आमची रणनिती तयार आहे, असा विश्वासही नाना पटोलेंनी व्यक्त केला.

‘पराभवाच्या कारणाची स्क्रिप्ट तयार’

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतदेखील महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे 20 तारखेला निकालानंतरच्या कारणांची स्क्रिप्ट नाना पटोलेंकडून आधीच तयार करतायत, असं प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

भाई जगतापांची शरद पवारांशी भेट

विधान परिषद निवडणुकीत यंदा काँग्रेसचे उमदेवार असलेले भाई जगताप यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. निवडणुकीत विजयी होण्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीने शरद पवारांची घेतलेली ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जात आहे.

अग्नीपथ ही देशाच्या सुरक्षा यंत्रणेची चेष्टा- नाना पटोले

14-15 राज्यात केंद्र सराकरच्या अग्रीपथ योजनेचा विरोध केला आहे. मागील 8 वर्षात तरुणांना फसवलं आणि तरुणांना फसवलं आणि आगीच्या झोतात टाकलं, म्हणून या योजनेच नाव अग्नीपथ ठेवलंय का, असा प्रश्न निर्माण होतोय. सरकारनी उत्तर दिलंय. सध्या पैसे नाहीत म्हणून अशा प्रकारची कंत्राटावर भरती होतेय, असं स्पष्टीकरण सरकारनं दुसऱ्या दिवशी दिलं. 2 वर्षात 212 टक्के भारतीयांचे पैसे स्वीस बँकेत आले, असा अहवाल आलाय. याचाच अर्थ देशाचा काळा पैसा भारतात आणण्याचा दावा करणाऱ्यांचाच पैसा तिकडे गेलाय.. तर इकडे अशा प्रकारची सैन्यभरती करून देशाच्या सुरक्षेची आणि तरुणांची थट्टा करावी, यासाठी देशाच्या जनतेकडे माफी पंतप्रधानांनी मागावी, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.