MLC Election Results 2022: नाथाभाऊंना राजकीय जीवदान, का आहे विधान परिषदेचा विजय खास? वाचा ही 5 कारणे

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Ekanath Khadse) यांचा विधान परिषदेत (Vidhan Parishad Election 2022) अखेर विजय झाला

MLC Election Results 2022: नाथाभाऊंना राजकीय जीवदान, का आहे विधान परिषदेचा विजय खास? वाचा ही 5 कारणे
एकनाथ खडसेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 9:43 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Ekanath Khadse) यांचा विधान परिषदेत (Vidhan Parishad Election 2022) अखेर विजय झाला. मागच्या विधानसभेवेळी त्यांना भाजपनं (BJP) शेवटपर्यंत वेटींगवर ठेवलं. त्यानंतर शेवटच्या दिवशी खडसेंना तिकीट न देता भाजपानं त्यांची मुलगी रोहिणी खडसेंना उमेदवारी देत मैदानात उतरवलं. पण शेवटी मुलीचाही पराभव झाला. आता एकनाथ खडसे काय करणार अशी चर्चा सुरु झाली. नंतर काही दिवसातच खडसे हे रितसरपणे राष्ट्रवादीत दाखल झाले. पण त्यानंतरही त्यांची राजकीय इनिंग काही सुरु होऊ शकली नाही. त्यामुळे खडसेंच्या विजयाचे अनेक कंगोरे आहेत. ते समजून घेऊया.

1. खडसेंना राजकीय जीवदान

विधानसभेला भाजपनं तिकीट नाकारलं नंतर मुलगीही पडली. भाजपात एकनाथ खडसेंच्या राजकारणाचा शेवट झाल्याची चर्चा सुरु झाली. पण शांत बसतील ते खडसे कसले. त्यांनी पराभवानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टिका करायला सुरुवात केली तीही भाजपच्याच व्यासपीठांवरुन तसच पत्रकारांसमोर. परळीत पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर तर चंद्रकांत पाटीलही हजर होते. त्यांच्या समोर खडसेंनी फडणवीसांवर जोरदार टिका केली. पण शेवटी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आता विधान परिषदेत विजय मिळवला. ह्याएका विजयामुळे एकनाथ खडसेंना राजकीय जीवदान मिळालेलं आहे. खडसे आता त्याच तोऱ्यात पुन्हा सभागृहात दिसतील हे निश्चित.

2. भाजपवर टिका करण्यासाठी हुकमी एक्का

भाजपवर सध्या एकच नेता रोज तुटून पडलेला असतो. विषय कुठलाही असो पण बोलतो एकच. ते म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत. काँग्रेसच्या नेत्यांना भाजपवर टिका करण्यात किंवा त्यांना घेरण्यात काहीच रस नसल्याचंच पुन्हा पुन्हा दिसून आलंय. राऊतानंतर जर भाजपवर त्यातही देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दात बोलणारा दुसरा नेता म्हणजे एकनाथ खडसे. ते बोलतात तेव्हा अनुभवासह सांगतात. त्यामुळे खडसेंच्या टिकेला एक वजन असतं. बरं खडसे सभागृहाबाहेर जसं बोलतात तसे ते सभागृहातही तुटून पडतात विरोधकांवर. त्यामुळे भाजपला सभागृहात तसेच सभागृहाच्या बाहेर जशास तसं उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या हाती एकनाथ खडसे नावाचा हुकमी एक्का असेल.

3.उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बळ

उत्तर महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे मोठे नेते म्हणजे छगन भुजबळ. पण त्यांचा प्रभाव नाशिक आणि जिल्ह्यापुरता पहायला मिळतो. खानदेशात भुजबळांची पोहोच नाही असं नाही पण नाशिक शहर आणि जिल्हाच एवढा मोठा आहे आणि महत्वाचा आहे की, राष्ट्रवादीला दुसऱ्या नेत्याची तिथं नितांत गरज आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले आणि ती कसर भरुण निघाली. भाजपच्यावतीनं खानदेशात गिरीश महाजन किल्ला लढवतायत. त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारा दुसरा नेता खडसेंच्या रुपानं राष्ट्रवादीला सापडलेला आहे. खडसेंकडे ती ताकदही आहे आणि अनुभवही. त्यामुळेच खडसेंच्या विजयामुळे खानदेशात राष्ट्रवादीला बळ मिळालेलं आहे.

4. खडसेंचा ओबीसी चेहरा

महाराष्ट्रात फडणवीसांचा जसा राजकीय आलेख वाढत गेला तसा, ओबीसींवर अन्याय होत असल्याचा सुरही ऐकायला येऊ लागला. त्यातच गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं. पंकजा मुंडेंचा नंतर विधानसभेला पराभव झाला. त्याचं खापर फडणवीसांवर फोडलं गेलं. खडसेंवर अन्याय म्हणजे ओबीसींवर अन्याय असे ढोलही वाजवले गेले. त्यात काही वेळेस तथ्य असल्याची भावनाही तयार झाली. राष्ट्रवादी हा मराठा बेस पक्ष असल्याची टिका-टिप्पणीही पहिल्यापासून केली गेलीय. पण भुजबळ, मुंडे, तटकरे आणि आता खडसे यांच्यामुळे ओबीसींनाही राष्ट्रवादीत स्थान असल्याचा मेसेज जाईल. त्यामुळे भाजपवर नाराज असलेले ओबीसी राष्ट्रवादीला जवळ करतील असा कयास लावला जातोय. यात राष्ट्रवादीचाही फायदा आहे आणि खडसेंचाही.

5. महाराष्ट्रचा नेता

एकनाथ खडसे हे भाजपात असते तर ते त्या पक्षाचे सर्वाधिक काळ घातलेले नेते असते. म्हणजे खडसे हे भाजपचे महाराष्ट्रातले फाऊंडर नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे फक्त उत्तर महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्रभर त्यांना ओळखणारे सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते आहेत. एका अर्थानं ते महाराष्ट्राचे नेते आहेत. तशी त्यांना राजकीय मान्यता आहे. त्यामुळेच आगामी सगळ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून खडसेंचा वापर होईल. त्याचा फायदा दोघांनाही मिळेल. त्यातच जर राष्ट्रवादीनं खडसेंना मंत्री केलं तर त्यांचा उपयोग पक्ष अन् प्रशासन अशा दोन्ही पातळीवर होईल. त्यामुळे खडसेंचा विजय अनेक अर्थानं महत्वाचा आहे.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.