ट्रायडंट फळले नाही, रेनेसाँ तरी लाभदायक ठरणार का? शिवसेनेच्या आमदारांचा पवईतल्या हॉटेलमध्ये मुक्काम, 18 जूनला महत्त्वाची बैठक

दरम्यान भाजपनेदेखील विधन परिषद निवडणुकीसाठी जंगी तयारी केली असून 18 जूनपासूनच आमदारांना मुक्कामी बोलावले आहे. अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांशी भाजपने संपर्क सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ट्रायडंट फळले नाही, रेनेसाँ तरी लाभदायक ठरणार का? शिवसेनेच्या आमदारांचा पवईतल्या हॉटेलमध्ये मुक्काम, 18 जूनला महत्त्वाची बैठक
राज्यसभा निवडणुकीवेळी हॉटेल ट्रायडंटमधील बैठकीचे छायाचित्र Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 12:03 PM

मुंबईः राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) मतदानात दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेनं महाविकास आघाडी आणि अपक्ष आमदारांना नरिमन पॉइंटमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी काही आमदारांनी दगाफटका केल्यामुळे राज्यसभेत शिवसेनेला (Shiv Sena) पराभवाच्या नामुष्कीला तोंड द्यावे लागले. आता विधान परिषद निवडणुकीत ही वेळ येऊ नये म्हणून शिवसेना पूर्ण खबरदारी घेत आहे. 20 जून रोजी विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. शिवसेनेनं आपल्या आमदारांना पवईतील रेन्सॉ हॉटेलमध्ये मुक्कामाला (MLAs in Hotel) बोलावलं आहे. 18 जून रोजी शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त घोडेबाजार टाळण्यासाठी महत्त्वाची रणनिती यात आखली जाईल. तसेच आमदारांना मतदान प्रक्रिया समजावून सांगितली जाईल.

ट्रायडंटचं फळ मिळालं नाही?

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडीनं सर्व आमदारांना नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये मुक्कामी बोलावलं होतं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांची बैठक घेतली होती. तरीही ऐन वेळी काही आमदारांनी दगा दिल्यामुळे शिवेसेनेचा उमेदवार राज्यसभेत पराभूत झाला आणि मतांचं पाठबळ कमी असूनही अंतिम फेरीत भाजप विजयी झाला. आता शिवसेनेनं आपल्या आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला बोलावलं आहे. पवईतील रेन्सॉ हॉटेलची यासाठी निवड करण्यात आली आहे. इथली रणनीती तरी यशस्वी होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी स्थापन होतानाची बैठकदेखील ट्रायडंटमध्ये झाली होती. तिथेच आघाडीने ऐक्य दाखवलं होतं. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने ट्रायडंटमध्ये आमदार ठेवले होते.

हे सुद्धा वाचा

भाजपाचा आमदारांशी संपर्क सुरू

दरम्यान भाजपनेदेखील विधन परिषद निवडणुकीसाठी जंगी तयारी केली असून 18 जूनपासूनच आमदारांना मुक्कामी बोलावले आहे. अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांशी भाजपने संपर्क सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील तीन दिवसांपासून आमदारांना भाजपकडून संपर्क साधला जात आहे. तसेच आपापल्या विभागानुसार आमदारांनी भाजप नेत्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही भाजपतर्फे देण्यात आल्या आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.