Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी औरंगाबादेत शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन, राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीनसह अनेक पिकं वाहून गेली. तर काही भागात जमीनही खरडून गेली आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी औरंगाबादेत शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन, राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
औरंगाबादेत मनसेचं आंदोलन
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 1:46 PM

औरंगाबाद : सप्टेंबच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं होतं. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीनसह अनेक पिकं वाहून गेली. तर काही भागात जमीनही खरडून गेली आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी आज औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मनसेकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. (MNS agitation in Aurangabad demanding help to farmers)

पंचनाम्याची नाटकं बंद करा आणि शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजाराची मदत करा, अशी आक्रमक मागणी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मनसेकडून औरंगाबादेत आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तसंच मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला मनसेचा विरोध

दरम्यान, लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मनसेनं विरोध केला होता. जनतेच्या जीवाशी खेळ करुन राजकारणाची पोळी भाजणारी महाभकास आघाडी. उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनात जो दुर्दैवी प्रकार झाला त्याचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे, पण म्हणून ‘महाराष्ट्र बंद’ पुकारुन राज्य सरकार काय साध्य करतंय? गाड्यांची तोडफोड करणारे, जबरदस्ती करुन दुकानं बंद करायला लावणारे ही गुंडशाही का आपल्या उरावर बसलेय? कोरोनातून आत्ता कुठे सगळे सावरत असताना जखमेवर मीठ चोळणारे किती विकृत मनोवृत्तीचे असतील!, अशा शब्दात मनसे नेते अमेय खोपकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

नवाब मलिकांचा मनसेला सवाल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लखीमपूरच्या हिंसेवरून मनसेला धारेवर धरले. लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे म्हणजे मविआने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?, असा सवाल मलिक यांनी केला.

इतर बातम्या :

यंदा शिवसेनेच्या मेळाव्यात ‘राम’दास कदम नाहीत, ऑडिओ क्लिपप्रकरण भोवलं?

VIDEO: मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’

MNS agitation in Aurangabad demanding help to farmers

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.