Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित!’ राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार नाहीत, कारण पुण्यात सांगणार!

Raj Thackeray : तूर्तास हा दौरा स्थगित केला असल्याची घोषणा राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

'तूर्तास अयोध्या दौरा स्थगित!' राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार नाहीत, कारण पुण्यात सांगणार!
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगितImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 10:25 AM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा (Raj Thackeray Ayodhya Tour) स्थगित केला आहे. तूर्तास हा दौरा स्थगित केला असल्याची घोषणा राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. 5 जून रोजी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार होता. हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. 22 मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत. 5 जून रोजी होणारा राज ठाकरे (Raj Thackeray News) यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित होण्याची शक्यता टीव्ही 9 मराठीच्या विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी ठीक दहा वाजता याबाबत ट्वीट (Raj Thackeray Tweet) केलंय. अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची अधिकृत घोषणा राज ठाकरे यांनी केली. आता पुण्यात 22 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी पुण्यात मनसैनिकांकडून करण्यात येतेय. या सभेमध्ये राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. राज ठाकरेंनी याआधी केलेल्या आपल्या भाषणांमधून उत्तर भारतीय जनतेचा अपमान केला असल्याचं आरोप बृजभूषण सिंह यांनी केल्यानंतर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अधिकच चर्चेत आला होता. दरम्यान, आता राज ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याचं स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा

पाहा राज ठाकरेंचं ट्वीट :

का रद्द केला दौरा?

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित का झाला, त्याचा उहापोह राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेत करतील. मात्र आतापासून त्यांनी दौरा रद्द का केला, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीला पुरेसा वेग आलेला नव्हता, असंही सांगितलं जातं. तसंच रेल्वेचं आरक्षणही झालेलं नव्हतं. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी 5 जूनला दौरा स्थगित करण्यात आला असावा, असा तर्क लढवला जातोय.

पाहा Video :

पुण्यात 22 तारखेला सभा

आता राज ठाकरेंची पुण्यात 22 मे रोजी सकाळी 10 वाजता गणेश कला क्रीडा केंद्र इथं सभा होणार आहे. या सभेचा पोस्टरही नुकताच अमेय खोपकर यांनी शेअर केला होता. त्यानंतर आता राज ठाकरे आपल्या पुण्यातील सभेत काय भूमिका मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा.
'अंदर की बात है...', विरोधकांच्या घोषणाबाजीवर फडणवीसांचा मिश्कील टोला
'अंदर की बात है...', विरोधकांच्या घोषणाबाजीवर फडणवीसांचा मिश्कील टोला.
कबरीच्या वादामुळे बीबी का मकबरा परिसरातही पसरला शुकशुकाट
कबरीच्या वादामुळे बीबी का मकबरा परिसरातही पसरला शुकशुकाट.