सतेज पाटलांच्या कोल्हापुरातील घरी राज ठाकरे
कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या घरी हजेरी लावली. सतेज पाटील हे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. सतेज पाटील यांच्या घरी राज ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याने कोल्हापूरकरांसह संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं […]
कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या घरी हजेरी लावली. सतेज पाटील हे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. सतेज पाटील यांच्या घरी राज ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याने कोल्हापूरकरांसह संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
सतेज पाटील आणि राज ठाकरे हे समीकरण तसं न जुळणारं असलं, तरी राज ठाकरे हे थेट सतेज पाटलांच्या घरी गेल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही भेट राजकीय आहे की वैयक्तिक, हे अद्याप कळू शकलं नाही. मात्र, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अत्यंत मोठ्या आणि ताकदवान नेत्याच्या घरी राज ठाकरे गेल्याने अर्थात चर्चांना सुरुवात झाली आहे.
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांबाबत अद्याप कोणतेच भाष्य केले नाही. मनसे निवडणुका लढवणार का, इथपासूनच मनसेचे कार्यकर्ते संभ्रमात आहे. पक्षाध्यक्षांकडून अद्याप कोणतीही जाहीर घोषणा करण्यात आली नाही. त्यातच राज ठाकरेंच्या मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भातही दुसरीकडे चर्चा सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांची भेट महत्त्वपूर्ण आहे.
राज ठाकरे यांचा मनसे पक्ष कोल्हापुरात ताकदवान नसला, तरी मनसेचे कार्यकर्ते राज्यतील सर्व जिल्ह्यांमध्ये दखल घ्यायला लागावी, अशा संख्येत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला राज्याच्या राजकारणात मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
दुसरीकडे, सतेज पाटील हे कोल्हापूरच्या राजकारणातील अत्यंत मोठं नाव आहे. काँग्रेसचे नेते असेलेल्या सतेज पाटलांचं कोल्हापूरच्या राजकारणावर चांगली पकड आणि वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय माहिडक यांचे ते कट्टर विरोधक मानले जातात. मात्र, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने सतेज पाटलांची भूमिका काय असेल, याबाबतही उत्सुकता आहे. सतेज पाटील हे महाडिकांना मदत करणार की, आणखी कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशाच राजकीय संभ्रमांच्या काळात राज ठाकरेंनी सतेज पाटलांची भेट घेतल्यांना चर्चांना जोरदार वेग आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांच्या दौऱ्यावर आहेत. त्याच अंतर्गत राज ठाकरे यांचा आज कोल्हापूर दौरा असून, या दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मातेचं दर्शन घेऊन केलं. एका खासगी वाहिनीचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, तत्पूर्वी राज ठाकरे यांनी अंबाबाई मातेचं दर्शन घेतलं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधाकिरी आणि कार्यर्तेही राज ठाकरे यांच्यासह उपस्थित होते.
दरम्यान, सतेज पाटील यांच्यासोबतच्या भेटीवर आणि एकंदरीतच कोल्हापूर दौऱ्याबाब राज ठाकरे काय बोलतात, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.