AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेसाठीचे तिकीट कोणाला आणि कसे देणार? राज ठाकरे स्पष्टच बोलले

यावेळी राज ठाकरेंनी विधानसभेसाठी मनसेचे सूत्र कसं असेल याची माहिती दिली. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीटांचे वाटप कशाप्रकारे केले जाईल, याबद्दलही सांगितले.

विधानसभेसाठीचे तिकीट कोणाला आणि कसे देणार? राज ठाकरे स्पष्टच बोलले
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 1:13 PM

Raj Thackeray On Assembly election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी रणनिती काय असेल, पक्ष किती जागा लढणार, तिकीटाचे वाटप कसे होणार, याबद्दल जाहीरपणे माहिती दिली. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात झालेल्या पदाधिकारी मेळाव्यातील भाषणादरम्यान त्यांनी याबद्दल भाष्य केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात एक मेळावा आयोजित केला होता. गुरुवारी २५ जुलै सकाळी ११ वाजता हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज ठाकरेंनी विधानसभेसाठी मनसेचे सूत्र कसं असेल याची माहिती दिली. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीटांचे वाटप कशाप्रकारे केले जाईल, याबद्दलही सांगितले.

“आजच्या बैठकीला बोलावण्याचं कारण म्हणजे, हे सर्व्हे असतो ना, पक्षातील एक चार पाच जणांची टीम केली आहे. तुम्हाला माहीत नसेल. ते तुमच्या तालुक्यात येऊन गेले. सर्व्हे झाला. पत्रकारांशी बोलले, परत ते चार पाच दिवसात तुमच्याकडे येतील. तुम्हाला भेटतील. काय परिस्थिती आहे. ते सांगा. काय गोष्टींचं गणित घडू शकते. काय करता येऊ शकतं, याचा विचार करा. आकलन करा”, असे राज ठाकरे म्हणाले.

“निवडून येण्याची कॅपेसिटी असलेले, तयारी असलेल्यांनाच तिकीट देणार आहे. तिकीट मिळालं की पैसे काढायला मोकळा अशा लोकांना तिकीट देणार नाही. तुम्ही जे बोलाल, सांगाल, जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष येऊ शकले नाही. जे कुणी आहे, माहिती आहे. ती नीट माहिती द्या. प्रामाणिकपणे द्या. तुम्ही दिलेली माहितीही चेक केली जाणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोकं काही करून सत्तेत बसवायचे आहेत. काहीही करून. अनेक लोकं हसतील. हसू दे. मला काही हरकत नाही. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सर्वच जण आम्ही तयारीला लागलो आहोत. तुमच्यापर्यंत ही लोकं येतील. मग युती होईल का जागा मिळतील का. असा निर्णय मनात आणून नका. जवळपास सव्वा दोनशे ते २५० जागा लढवणार आहोत”, असेही राज ठाकरेंनी सांगितले.

“तुम्ही मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुमची वर्णी लागेल असं समजू नका. सर्व गोष्टी चेक करणार. त्यामुळे टीम येईल, तुम्हाला फोन करेल. बोलतील. त्यानंतर माझ्याकडे सर्व्हे येईल. त्यानंतर पावसापाण्याचा विचार करून १ ऑगस्टपासून राज्याचा दौरा सुरू करतोय”, असेही राज ठाकरेंनी म्हटले.

दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा
दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा.
गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम - मुख्यमंत्री फडणवीस
गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम - मुख्यमंत्री फडणवीस.
बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार
बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार.
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ.
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.