मला तडजोड करावी लागली तर मी… राज ठाकरे यांचं मोठं विधान; मेळावा घेऊन संताप व्यक्त करणार

राज ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात राज यांना भेटण्यासाठी त्यांची मैत्रीण आली. तिने आपल्या नवऱ्याची ओळख देखील करून दिली. राज यांना शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांना अरेतुरे एकेरी उल्लेख करत तिने आठवणींना उजाळा दिला. राज यांनी देखील संवाद साधला.

मला तडजोड करावी लागली तर मी... राज ठाकरे यांचं मोठं विधान; मेळावा घेऊन संताप व्यक्त करणार
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 2:41 PM

चिपळूण, दिनांक 13 जुलै 2023 : राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी केल्याने ही समीकरणे बदलली आहेत. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यात जो व्याभिचार सुरू आहे. त्यावर मी मेळावा घेऊन संताप व्यक्त करणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते चिपळूणमध्ये आहेत. त्यानंतर ते खेड आणि दापोलीला भेट देणार आहेत. या कोकण दौऱ्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे कोकणात आले आहेत. चिपळूणमध्ये येताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. फूल आणि गुलालांची उधळण करून राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनानंतर मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

हे सुद्धा वाचा

तर घरात बसेन

येत्या 15 दिवसात मेळावा घेणार आहे. हा मेळावा घेऊन मनातील संताप बाहेर काढायचा आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर आणि राजकीय व्याभिचारावर भाष्य करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली. मला तडजोड करावी लागली तर घरात बसेन. पण तडजोड करणार नाही. राज्यात जो व्याभिचार सुरू आहे. तो मी करणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

मनाने एकमेकांशी बोला

कशासाठी करत आहोत? या गोष्टी का करायच्या आहेत? याचा विचार आपण का करत नाही? लोकसभेची निवडणूक का लढवायची? असा सवाल करतानाच नाका तिथे शाखा ही मोहीम राबवा, अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली. एखाद्या पदावर बसल्यावर त्या व्यक्तिकडून कामं होत नसतील तर तो पदासाठी योग्य नाही. पदांनी एकमेकांशी बोलण्यापेक्षा मनाने एकमेकांशी बोललं पाहिजे, असंही ते म्हणाले.

तर दुसरी माणसं येतील

महाराष्ट्रावरती प्रेम करा कमी होऊ देऊ नका. तुमच्यातला राग कमी होऊ देऊ नका. महाराष्ट्रासाठी लढा. महाराष्ट्रातील नागरिकांवरती प्रेम करा. पक्ष नव्हे एक कुटुंब म्हणून काम करा. आज उपस्थित असणाऱ्या लोकांचा एक वॉट्सअप ग्रुप तयार करा. तुमचं काम चांगलं पाहिजे, कुणाकडून तक्रारी येऊ नयेत अन्यथा कारवाई केली जाईल. काम करणार नसतील तर दुसरी माणसं येतील, माणसांची कमी नाहीये. मनसेचा आमदार, खासदार झाला पाहिजे, असं लोकांना वाटतंय, असंही ते म्हणाले.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.