Sanjay Raut : “कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधं देऊन दवाखाना चालत नसतो”, मनसेच्या गजानन काळेंचा राऊतांना टोला
Sanjay Raut : मनसेच्या गजानन काळे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
मुंबई : सध्या राज्यात राजकीय अस्थिरता आहे. अश्यात सत्ताधारी-विरोधक यांच्यात बऱ्याच आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणीची पाहायला मिळत आहेत. अश्यात मनसेच्या गजानन काळे (Gajanan Kale) यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) टोला लगावला आहे. “कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधं देऊन दवाखाना चालत नसतो”, असं गजानन काळे यांनी म्हटलंय.
“वडिलांनी दवाखाना थाटून दिला तरी डॅाक्टरला स्वतः अभ्यास करुन पेशंटची नस ओळखता आली पाहिजे… दररोज राऊंड घेतले पाहिजे … कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो… एक ना एक दिवस पेशंट शेजारच्या दवाखान्यात जाणारच…!”, असं ट्वि त्यांनी केलं आहे. शिवाय पुढे त्यांनी अराजकीय हा हॅशटॅग वापरला आहे.
गजानन काळे यांचं ट्विट
वडिलांनी दवाखाना थाटून दिला तरी डॅाक्टरला स्वतः अभ्यास करुन पेशंटची नस ओळखतां आली पाहिजे … दररोज राऊंड घेतले पाहिजे … कंपाऊंडरच्या सल्ल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो … एक ना एक दिवस पेशंट शेजारच्या दवाखान्यात जाणारच…!#अराजकीय
सौजन्य – #WhatsApp
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 25, 2022
आजारी पडल्यावर मी डॉक्टरकडून औषधं घेत नाही. तर कंपाऊंडरकडून घेतो, असं संजय राऊत यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं. त्याचा संदर्भ त्यांनी आताच्या राजकीय परिस्थितीशी जोडला आहे. एक ना एक दिवस आमदार दुसऱ्या पक्षात जाणारच होते. ते गेले, अश्या आशयाचं ट्विट त्यांनी केलंय.
सध्या राज्यात काय परिस्थिती
राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घाडमोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आज राज्यपालांना पत्र देणार असल्याची माहिती आहे. मविआ सरकारचा पाठिंबा काढण्यासंदर्भात हे पत्र असल्याच माहिती आहे. राज्यपालांना पत्र देण्याची शिंदे गटाची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. शिंदे गट हीच शिवसेना असल्याचा दावा राज्यपालांकडे देणाऱ्या पत्रात केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे सरकार अल्पमतात असल्याचं एकप्रकारे राज्यपालांना शिंदे गटाकडून सांगितलं जाईल. यानंतर राज्यपाल महोदय महाविकास आघाडी सरकारला बहुमद सिद्ध करण्याच्या सूचना देऊ शकतात. यामुळे ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय. यामुळे सरकार अल्पमतात येण्याची देखील शक्यता आहे