मनसे-भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच आहे; बाळा नांदगावकरांनी दिले युतीचे संकेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज भेट झाली. या भेटीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठं विधान केलं आहे. (MNS leader Bala Nandgaonkar reaction on mns-bjp alliance)
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज भेट झाली. या भेटीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठं विधान केलं आहे. मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल, असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं. त्यामुळे राज-पाटील भेटीत युतीवरच अधिक चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (MNS leader Bala Nandgaonkar reaction on mns-bjp alliance)
बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी बोलताना हे विधान केलं. राज ठाकरे, अमित ठाकरे हे नाशिक, पुणे आणि ठाण्याच्या दौऱ्यावर होते. मुंबईतही आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम करत आहोत. व्यक्तिगत पातळीवर सर्वच पक्षाची कामं सुरू आहेत. पण दोन पक्ष भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा आनंदच असेल, असं नांदगावकर म्हणाले.
ठोकताळ्यांचा अंदाज घ्यावा लागतो
राजकारणात पुढच्या मुव्हमेंट करायच्या असतात. त्याचे काही ठोकताळे असतात. त्या ठोकताळ्याचा अंदाज प्रत्येक पक्ष घेत असतो. शरद पवारांनी ठोकताळ्यांचा अंदाज घेऊन उद्धव ठाकरेंना बोलवून केलं ना सरकार. आजचाही हा ठोकताळाच आहे. त्याप्रमाणे होणार काही घटना, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
हिंदुत्व रक्तातच
मनसे पुन्हा हिंदुत्वाची भूमिका घेणार आहे का?, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, राज ठाकरे यांच्या रक्तातच हिंदुत्व आहे. त्यामुळे तसा काही प्रश्नच येत नाही. आम्ही हिंदुत्व घेऊनच जात आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राऊतांनी लढवू दाखवावंच
तर मनसे आणि भाजपने एकदा ताकद आजमावून दाखवावीच या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतला. संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच, असं आव्हान त्यांनी दिलं.
युतीची चर्चा नाही
दरम्यान, त्या आधी चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ते ऐकलं. त्यावरून आमच्यात चर्चा झाली. ही सदिच्छा भेटी होती. राजकीय चर्चा झाली. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही, असं पाटील यांनी सांगितलं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. नाशिकला ते ही जातात मी ही जातो. आम्ही अचानक भेटलो. मी गेले वर्षभर बोलतोय त्यांनी त्यांची भूमिका बदलावी. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली. राजसाहेब म्हणाले, यूपीतील माणसाला यूपीमध्ये 80 टक्के नोकऱ्या हव्या, हे मी यूपीत जाऊन म्हणेन, तसंच मी महाराष्ट्रातील मराठी मुलांना इथेच रोजगार मिळायला हवा असंही त्यांनी सांगितलं. यात गैर काय आहे? असा सवालही त्यांनी केला. (MNS leader Bala Nandgaonkar reaction on mns-bjp alliance)
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 6 August 2021https://t.co/q0P40NKTCR #MahafastNews | #TV9Marathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2021
संबंधित बातम्या:
राज ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
राजकीय चर्चा नक्कीच झाली, पण युतीची चर्चा नाही; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?, चंद्रकांत पाटील यांनी डिटेल सांगितलं!
(MNS leader Bala Nandgaonkar reaction on mns-bjp alliance)