MNS vs NCP : शरद पवारांच्या सभेत भाडोत्री लोक, मनसे नेते गजानन काळेंचा आरोप, जयंत पाटलांनाही सुनावलं
पुन्हा एकदा मनसेनं राष्ट्रवादीला डिवचंलय.
मुंबई : राष्ट्रावादी (NCP) आणि मनसे (MNS) या दोन्ही पक्षातील नेते नेहमी एकमेकांवर वार-पलटवार, टीका टिप्पणी करताना दिसून येतात. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. यात आता पुन्हा एकदा मनसेनं राष्ट्रवादीला डिवचंलय. मात्र, यावेळी राज ठाकरेंनी नव्हे तर मनसे प्रवक्ते गजानन काळे (gajanan kale) यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलंय. गजानन काळे यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांवर निशाणा साधताना काळे म्हणाले की, ‘पवार साहेबांची सभा कोल्हापूरला झाली होती. त्यावेळी भाड्याने आणि पैसे देऊन आणलेली तेथे लोक होती. पवार साहेबांचं भाषण सुरू झालं आणि लोकं निघायला लागली. राज साहेबांच्या सभेतील गर्दी जोपर्यंत राष्ट्रगीत होत नाही तोपर्यंत आम्ही स्तब्ध उभे असतो. आमच्या पक्षाची स्थापना झाली आणि हा पक्ष घरोघरी पोहोचला आहे,’ असं काळे म्हणालेत.
जयंत पालटलांवर टीका
मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवरही टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘आमच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःचा पक्ष 2 जिल्हाभर कसा वाढेल. हे पहा. जयंत पाटलांच्या राष्ट्रात हा पक्ष फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आहे. विधानपरिषदेच्या बाहेर जयंत पाटलांनी 5 हजार लोक जमा करून दाखवावीत. चार खासदार आणि आपण पंतप्रधान बनण्याची स्वप्न बघता ? पाटील साहेब खूप जास्त बोलत आहेत,’ असं काळे यावेळी म्हणालेत.
आजाराची चेष्टा करणं योग्य नाही
मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पहिल्या दिवसांपासून मास्क घातलं होतं. तरीही दोनदा कोरोना झाला आहे. सुप्रियाताई नेहमी मास्क घालत होत्या. सुप्रियाताई यांनासुद्धा कोरोना झाला होता. एखाद्या आजाराची चेष्टा करणाऱ्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजितदादांना शोभत नाही. मुद्दे कुठे भेटले नाही तर राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा असा स्वभाव आहे? तो त्यांनी बदलावा एवढीच विनंती करतो.’
90 टक्के भोंगे खाली उतरले
यावेळी काळेंनी भोंग्यांचा मुद्दा देखील मांडला. यावेळी ते म्हणाले की, ‘हा विषय राजसाहेबांच्या पत्रात नमूद आहे हा विषय राज्यात आणि देशात अनेकदा घेतला गेला. भोंगे उतरले पाहिजे. मात्र, सरकारने आणि प्रशासनाने मशिदीवरील भोंगे हा विषय गांभीर्यानं घेतला नाही. भोग्यांचा प्रचंड त्रास आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी सभेत मशिदीवरील अजन बंद न झाल्यास हनुमान चालीसाच लावू असे बोलले होते. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर उत्तर प्रदेश सरकारने देखील अनेक मशिदीवरील भोंगे उतरले गेले. आज महाराष्ट्रात 90 ठिकाणी पोलीस प्रशासन सांगतंय की 90 टक्के ठिकाणी भोंगे खाली उतरले आहेत. सकाळचे अजान शंभर ठिकाणी बंद झाले आहे. काही ठिकाणी आवाजावर मर्यादा आली आहे. या विषयाचा शेवट करण्यासाठी आता जनचळवळ झाली पाहिजे. त्यामुळे राज ठाकरे यांचं मराठी हिंदी आणि इंग्रजी पत्र आम्ही आज नवी मुंबईत वाटप केलंय. यावेळी त्यांना थिएटरचा मुद्दाही मांडला. ‘सरकार मराठी आणि हिंदुत्व मांडणारी सरकार या महाराष्ट्रात आहे. तरीसुद्धा अनेक मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही. त्यासाठी भांडाव लागतं. आपण दक्षिणमध्ये पाहिलं तर तिथला स्थानिक सिनेमाला थेटर मिळतात आणि ते भांडाव देखील लागत नाही.
Tvu3 feed