Sanjay Raut : Get well Soon … ! ‘या’ नेत्याने भरला संजय राऊत यांचा मनोरुग्णालयाचा फॉर्म

Sanjay Raut : आतापर्यंत विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी टीका करताना, संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल केलं पाहिजे असं म्हटलं होतं. पण एकापक्षाने त्यापुढे जात, चक्क संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचा फॉर्म भरला आहे.

Sanjay Raut : Get well Soon ... ! 'या' नेत्याने भरला संजय राऊत यांचा मनोरुग्णालयाचा फॉर्म
Sanjay Raut
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 11:02 AM

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत दररोज विरोधी पक्षांवर निशाणा साधत असतात. विरोधी पक्षांवर ते अत्यंत कडव्या शब्दात टीका करतात. विरोधी पक्षांवर ते बोचरी, जिव्हारी लागणारी टीका करतात. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मग विरोधी पक्षांकडून सुद्धा तसच प्रत्युत्तर दिलं जातं. संजय राऊत यांच्या शब्द बाणांमधयून पंतप्रधान नरेद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, मनसे कोणी सुटत नाही. हेच संजय राऊत सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर तुटून पडले आहेत. महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर ते मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करत आहेत. मनसे सुद्धा संजय राऊत यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. आतापर्यंत विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी टीका करताना, संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल केलं पाहिजे असं म्हटलं होतं. पण एकापक्षाने त्यापुढे जात, चक्क संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचा फॉर्म भरला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी फॉर्म भरला आहे. हॉस्पिटलच्या एडमिशन अर्जामध्ये त्यांनी आपण संजय राऊत संपादक, सामना तथा खासदार यांचे हितचिंतक असल्याचे नमूद केले आहे. अर्जासोबत विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेल्या बातम्यांच्या सीडी आणि पेन ड्राईव्ह स्वरूपात देण्यात आल्या आहेत.

‘पूर्ण बरे होऊनच परत यावे…काळजी घ्या’

“संजय ऊर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातील विधान पाहता यांना मनोरुग्णालाय दाखल करणं गरजेच आहे. कधी त्यांना पवार साहेब या देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. कधी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. उद्धवजी पंतप्रधानपदाचे उमेदवार का असू नये? असं ते बोलतात. मनसेच्या वतीने पुणे येरवडा येथे असलेल्या मनोगरुग्णालयाचा संजय राऊत यांचा एडमिशन फॉर्म भरला आहे” असं गजनान काळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी संजय राऊत यांना गेट वेल सून म्हटलं आहे. “अ‍ॅडमिट होऊन योग्य उपचार घेऊनच आणि पूर्ण बरे होऊनच परत यावे…काळजी घ्या … !!!” असं सुद्धा म्हटलं आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....