‘मिटकरीच्या तोंडाला मुळव्याध झालाय, अजितदादांना विनंती आहे की त्यांनी…’ काय म्हणाले कर्णबाळा?
गाडीवर हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं तुम्ही म्हणता, "हा उद्रेक होता. मी प्रेस घेतो. तो त्याचवेळी तिथे आला. हे ठरवून केलेलं नाही. त्याचं बॅडलक" असं कर्णबाळा दुनबळे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना जाहीर धमकी देणारे मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर कर्णबाळा यांनी मीडियाशी संवाद साधला. “राज ठाकरे यांची भेट घेतली. अकोल्यात जो प्रकार झाला, मनसैनिकांचा जो उद्रेक होता, त्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली” असं कर्णबाळा दुनबळे म्हणाले. अमोल मिटकरी विषयी राज ठाकरे काय म्हणाले? त्यावर कर्णबाळा म्हणाले की, “जयमुळे आमचे साहेब खूप दु:खी आहेत. हे सर्व कसं घडलं? यामागे घातपात आहे का? हे जाणून घेतलं. त्यांनी जे निर्देश दिलेत, त्यानुसार काम करणार आहोत. मिटकरी बिटकरी सारख्या फालतू माणसासाठी आमच्या साहेबांकडे वेळ नाही. मिटकरीला काय बरळायचय ते बरळू द्या. त्याच्या तोंडाला मुळव्याध झालाय. त्याच्यावषयी काय चर्चा करायची”
“विषय आमच्या जयचा आहे, त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी अमित साहेब तिथे पोहोचले आहेत. मलाही आज तिथे जायचं होतं. पण साहेबांनी बोलवल्यामुळे शक्य झालं नाही. मला तिथे जाऊन जामिन करुन घ्यायचा आहे. एफआयआर दाखल झालाय. कायद्यापुढे शरण जाणार. काल तिघांचा जामीन झाला. आज आठ जण हजर झाले, तीन आणि आठ अकरा होतात. आम्ही दोघे तेरा. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत सर्वांचा जामीन होईल” असं कर्णबाळा म्हणाले.
कर्णबाळांनी अजित दादांना काय विनंती केली?
“तुम्ही संपूर्ण क्लिप पाहा, मी कुठेच दिसत नाही. मी त्यावेळी प्रेसमध्ये होतो” असं कर्णबाळा म्हणाले. गाडीवर हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं तुम्ही म्हणता, “हा उद्रेक होता. मी प्रेस घेतो. तो त्याचवेळी तिथे आला. हे ठरवून केलेलं नाही. त्याचं बॅडलक” असं कर्णबाळा दुनबळे म्हणाले. “अकोल्यातील नागरिकही अमोल मिटकरीसोबत नाहीत. अजितदादांना विनंती आहे, मिटकरीच्या तोंडाला मुळव्याध झालाय. हा माणूस तुमच्या पक्षाला डुबवणार. अजितदादा तुम्ही पितृतुल्य पवार साहेबांशी वैर घेऊन वेगळा पक्ष काढलात. तो पक्ष संपवण्याची सुपारी याने घेतलीय. या माणसाला याची जागा दाखवा” अशी विनंती कर्णबाळांनी अजितदादांना केली.